Jalgaon Saam
महाराष्ट्र

Jalgaon: मासिक पाळीत स्वंयपाक, सासू-नणंदेकडून बेदम मारहाण अन् गळा दाबून हत्या; जळगावमध्ये खळबळ

Womans Death in Jalgaon: जळगाव तालुक्यातील किनोद गावात एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप मृत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे.

Bhagyashree Kamble

जळगावात एका विवाहित महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मात्र, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप विवाहित महिलेच्या माहेरच्या कुटुंबाने केला आहे. मासिक पाळीत स्वयंपाक केल्यामुळे सासू आणि नणंद यांनी मिळून तरूणीची हत्या केल्याचा आरोप विवाहित महिलेच्या माहेरच्या कुटुंबाने केला आहे. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

नेमकं घडलं काय?

गायत्री ज्ञानेश्वर कोळी असे २६ वर्षीय मृत तरूणीचे नाव आहे. १ मे रोजी तिने घरात गळफास घेत आयुष्य संपवलं. तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आपल्या लेकीनं आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी तिचा गळा दाबून हत्या केल्याचा आरोप मृत तरूणीच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूणीच्या कुटु्ंबाने त्वरीत पोलीस ठाण्यात धाव घेतली, तसेच सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. 'गायत्री हिला मासिक पाळी आली होती. त्यादिवशी तिनं स्वंयपाक केला होता. मासिक काळात केलेला स्वंयपाक तिच्या सासूला आणि नणंदला चालत नव्हते. यावरून तिघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले. यादरम्यान, सासू आणि नणंदने लेकीला मारझोड केली, तसेच गळा आवळून तिची हत्या केली. नंतर आत्महत्या केल्याचा बनाव रचला', असं तक्रारीत मृत तरूणीच्या माहेरच्या कुटुंबाने म्हटलं आहे.

गायत्री ही जळगावातील किनोद गावात पती, सासू आणि मुलांसह राहत होती. गायत्रीच्या पतीचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय होता. ती शिवणकाम करून संसाराला हातभार लावत होती. मात्र, १ मे रोजी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृत तरूणीच्या माहेरच्या कुटुंबाने सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पनवेल ते सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमधून तरुण पडला

Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांच्या कामाची बातमी! ६० लाखांच्या होम लोनवर वाचवता येणार १९ लाख; ही ट्रिक वापरा

Face Care: रात्री मेकअप रिमूव्ह न करता झोपल्यास काय होते?

GK: तुम्हाला माहितेय का? 'हा' एक देश एका दिवससाठी भारताची राजधानी बनले

Betrayal Indian history: एकाच्या दगाबाजीने बदलला देशाचा इतिहास; कोण होता तो गद्दार राजा?

SCROLL FOR NEXT