Marigold Flowers saam tv
महाराष्ट्र

Dasara 2023 : झेंडू घ्या झेंडू... 50 रुपये किलाे झेंडू... दस-या निमित्त झेंडूची आवक वाढली, दर स्थिर (पाहा व्हिडिओ)

दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांचे दर आणखी वाढण्याची शक्‍यता विक्रेत्यांनी वर्तविली आहे.

Siddharth Latkar

शुभम देशमूख, अक्षय बडवे, राेहिदास गाडगे

Dasara 2023 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा अर्थात विजयादशमीच्या निमित्ताने राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यभरातील बाजारपेठांमध्ये झेंडू फूलांची आवक माेठ्या प्रमाणात झाली आहे. यंदा झेंडूला ठिकठिकाणी 50 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत किलाेचा भाव मिळत आहे. (Maharashtra News)

भंडारा शहरातील बाजारपेठ झेंडूच्या फुलांच्या खरेदीसाठी फुलून गेली आहे. दसरा सणाच्या निमित्ताने शहरात चैतन्यमय वातावरण आहे. उद्या झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने रविवारपासूनच शहरातील गांधी चौक, त्रिमूर्ती चौक, जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक आदी ठिकाणी झेंडूच्या खरेदी विक्रीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात झेंडूची फुले विक्रीसाठी दाखल झाली आहेत. मात्र या दिवशी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने किमतीत देखील वाढ झाली आहे. आज दर 50 ते 70 रुपये किलोप्रमाणे विक्रीस होते. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांचे दर आणखी वाढण्याची शक्‍यता विक्रेत्यांनी वर्तविली आहे.

पुण्यात विविध फुलांची आवक

उद्याच्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर आज झेंडूची फुले आणि तोरण खरेदी करण्यासाठी पुण्यातील मार्केटयार्ड फूल बाजारात मोठी गर्दी झाली होती. मध्यरात्री पासून बाजारात झेंडू, शेवंती, गुलाब सारख्या फुलांची खरेदीसाठी पुण्यासह इतर जिल्ह्यातील अनेकांनी या ठिकाणी गर्दी केलेलं पाहायला मिळाली. काही प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे फुलांवर परिणाम झाला आहे मात्र बाजारात झेंडूच्या फुलांना आज चांगली मागणी आहे तसेच दरही उत्तम मिळत असल्याचे व्यापा-यांनी नमूद केले.

झेंडुला ७० ते १०० रुपयांचा भाव

श्रावणमासातील पासुन फुलशेतीचा सिजन शेतक-यांसाठी पर्वणी ठरतोय. सध्या सर्वत्र फुलशेतीचे मळे फुलले पहायला मिळत आहेत उत्पादनही चांगलं मिळत आहे. उद्याच्या दस-याच्या मुहुर्तावर बाजारात झेंडुची मागणी वाढली असुन बाजारभावही १०० रुपयांपर्यंत मिळत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात फुलशेतीने शेतक-यांना सुगीचे दिवस आले आहेत.

दसरा दिवाळीच्या तोंडावर उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील फुलशेतीला चांगले दिवस आल्याचे चित्र आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

SCROLL FOR NEXT