Shirdi Sai Baba Mandir : भाविकांनाे !शिर्डीतील साई मंदिर उद्या रात्रभर खुले राहणार

भाविकांच्या स्वागतासाठी श्रीरामपूर मंदिराची भव्य स्वागत कमान उभारण्यात आली आहे.
Sai baba
Sai babasaam tv

- सचिन बनसाेडे

Shirdi News : शिर्डीत चार दिवस चालणा-या साईबाबांच्या पुण्यतीथी उत्सवाला आजपासून सुरूवात झाली आहे. साईमंदिरात काकड आरतीनंतर तदर्थ समितीचे सदस्य जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या हस्ते फोटो आणि पोथीची मिरवणूक काढण्यात आली. उत्सवा निमित्त चार दिवस भाविकांचा शिर्डीत मोठा उत्साह बघायला मिळणार आहे. (Maharashtra News)

Sai baba
FDA ची तुळजापुरात खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई, 9 व्यावसायिकांना शटर डाऊनचा आदेश

विजयादशमीच्या (vijaya dashami 2023) दिवशी साईबाबांची पुण्यतीथी असते. त्यामुळे दरवर्षी हा पुण्यतीथी सोहळा साजरा केला जातो. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवाला आजपासून सुरूवात झाली आहे. उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने उद्या साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहाणार आहे.

Sai baba
Dasara Melava In Chaundi : धनगर आरक्षणासाठी चौंडीत दसरा मेळावा : बाळासाहेब दोलताडे

उत्सव काळात लाखो भाविक साईदर्शनासाठी शिर्डीत येत असल्याने त्यांच्या निवास, भोजन , दर्शन आणि सुरक्षेची काळजी साईसंस्थानकडून घेण्यात येत आहे. आलेल्या भाविकांच्या स्वागतासाठी श्रीरामपूर मंदिराची भव्य स्वागत कमान उभारण्यात आली आहे.

यावर्षी उत्सवाच्या सांगतेच्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साई दरबारी असणार आहेत. यामुळे साईमंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com