Solapur News Saam Tv
महाराष्ट्र

Solapur News: सोलापुरात भिडेंच्या समर्थानात मोर्चा, पोलिसांनी केला लाठीमार

Sambhaji Bhide News: सोलापुरात भिडेंच्या समर्थानात मोर्चा, पोलिसांनी केला लाठीमार

साम टिव्ही ब्युरो

Solapur News: संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे संपूर्ण राज्यभर त्यांच्या विरोधात संतापाची लाट पसरलेली आहे. यातच आज सोलापूर येथे संभाजी भिडे यांच्या समर्थानात मोर्चा काढण्यात आला. भिडे यांचे समर्थक त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करणार होते.

मात्र याला पोलिसांनी परवानगी नाकारत सात ते आठ जणांना अगोदर ताब्यात घेतलं होतं. याचा निषेध करण्यासाठी भिडे गुरुजी समर्थक पोदर चावडी पोलीस स्टेशनवर मोर्चा घेऊन येत होते. यातच जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला आहे.

धुळ्यात संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध

धुळ्यात देखील महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संभाजी भिडे यांच्या पोस्टरला जोडे मारून व त्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

संभाजी भिडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले त्याचबरोबर महात्मा गांधी तसेच साईबाबा यांच्या विरोधामध्ये वादग्रस्त विधान केले आहे. याविरोधात राज्यभरात आंदोलन केले जात आहे. त्यानुसार धुळे येथे संभाजी भिडे यांच्या विरोधात महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

त्याचबरोबर संभाजी भिडे यांना पाठीशी घालणाऱ्यां विरोधात देखील आक्रमक भूमिका घेण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्या पोस्टरला संतप्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार, PMRDA कडून लॉटरी जाहीर; ठिकाण काय अन् अर्ज कसा कराल?

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार

Lotus Necklace Designs: कमळाच्या डिझाईन्सचे नाजूक आणि सुंदर नेकलेस, हे आहेत ५ ट्रेंडिंग पॅटर्न

Veg Soup Recipe: थंडीत जेवण वेळेवर पचत नाही? हे Veg सूप ठरेल बेस्ट, वाचा सिंपल रेसिपी

Mohammed Rafi Award 2025 : ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

SCROLL FOR NEXT