Haryana Nuh Clashes : '2.7 कोटींची लोकसंख्या, 60 हजार पोलीस, प्रत्येक व्यक्तीचे रक्षण करू शकत नाहीत', CM खट्टर यांचं नूह हिंसाचारावर वक्तव्य

Haryana Nuh Clashes Updates : '2.7 कोटींची लोकसंख्या, 60 हजार पोलीस, प्रत्येक व्यक्तीचे रक्षण करू शकत नाहीत', CM खट्टर यांचं नूह हिंसाचारावर वक्तव्य
Haryana Nuh Clashes
Haryana Nuh ClashesSaam Tv
Published On

Haryana Nuh Clashes Updates : हरियाणातील नूह येथे आणि नंतर गुरुग्राम, पलवारसह इतर काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना खट्टर म्हणाले की, या हिंसाचाराची सखोल चौकशी केली जात आहे. मुख्यमंत्री खट्टर पुढे म्हणाले की, पोलीस सर्वांना संरक्षण देऊ शकत नाहीत.

खट्टर म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण पोलिसांकडून करणे शक्य होणार नाही. म्हणूनच आम्ही शांततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून शांतता आणि सुरक्षा व्यवस्था राखली जाईल. खट्टर म्हणाले की, 2.7 कोटी लोकसंख्येवर 60 हजार पोलिस आहेत, मग सर्वांचे संरक्षण कसे करायचे.

Haryana Nuh Clashes
Share Market Closing: शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटींचे नुकसान...

या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री खट्टर पुढे म्हणाले की, दोषींची ओळख पटवली जात आहे. कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही. गैरकृत्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई केली जाईल. हिंसाचाराची सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. सीसीटीव्ही, फोन कॉल्स तपासले जात आहेत.

खट्टर म्हणाले की, राजस्थान पोलिसांनी मोनू मानेसरवर कारवाई करावी. आतापर्यंत 116 जणांना अटक करण्यात आली आहे. शहीद झालेल्या पोलिसांना 57 लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

Haryana Nuh Clashes
LGP Gas Accident Insurance: गॅस सिलिंडरचा अपघात झाला तर मिळेल ५० लाख रुपये, जाणून घ्या कसं करायचं क्लेम...

मनोहर लाल खट्टर म्हणाले की, आम्ही पोर्टलच्या माध्यमातून या हिंसाचारात झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करत आहोत. प्रत्येक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी लोकांना शांततेचे आवाहनही केले आहे. आमच्याकडे 60,000 पोलीस आहेत, त्यामुळे पोलिस सर्वांचे संरक्षण करू शकत नाहीत, असे मुख्यमंत्री खट्टर म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com