Maharashtra Weather News Saam Tv
महाराष्ट्र

Marathwada Rain Alert: मराठवाड्यात पाऊस पुन्हा हाहाकार माजवणार, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Maharashtra flood and crop damage risk due to heavy rains : मराठवाड्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा! हवामान विभागाने २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. बीड, धाराशिव, जालना, संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता.

Namdeo Kumbhar

IMD Issues Orange Alert for Marathwada, Farmers Advised to Stay Cautious : मागली काही दिवसांपासून मराठवाड्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात पावसामुळे मराठवाड्यातील ८ ही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बीड, धाराशिव, जालना अन् संभाजीनगरमध्ये सर्वाधिक पावसाने नुकसान केले आहे. बीड, जालना अन् धाराशीवमध्ये तर आभाळ फाटल्यागत पाऊस पडला अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पाऊस आला. पावसामुळे मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पण पुढील काही दिवस मराठवाड्यात पावसाचा उद्रेक कायम राहणार असल्याचा अंदाज पावसाने व्यक्त केला आहे. 27, 28 आणि 29 सप्टेंबर हे तीन दिवस मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यात पुढील २ दिवस पावसाचा जोर कमी राहणार आहे. पण त्यानंतर येत्या २७, २८ आणि २९ सप्टेंबर या तिन्ही दिवशी मराठवाड्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचे क्षेत्र आणि ते पुढे पश्चिमेकडे वळत असल्यामुळे मराठवाड्यात जोरदार पावसाचा पूर्वानुमान व्यक्त करण्यात आला आहे. सध्या तरी मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढे पावसाची तीव्रता पाहता हा अलर्ट बदलला जाऊ शकतो अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.

मराठवाड्यात सरासरीपेक्षा २४ टक्के अधिक पाऊस झाला आहे आणि त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ डॉ एस डी सानप यांनी मराठवाड्याशाठी तीन दिवस महत्त्वाचं असल्याचे सांगितले. मराठवाड्यातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी सावध राहावे, असेही ते म्हणाले आहेत.

बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाब प्रणाली निर्माण होत आहे. त्यामुळे कोकण, मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात पुढील 5,6 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन दिवस मराठवाड्यात पाऊस विश्रांती घेणार आहे. त्यानंतर तीन दिवस मराठवाड्यात पाऊस हाहाकार माजवण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आधीच जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे या मुसळधार पावसामुळे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT