Officials scrutinizing applications in Marathwada after massive Ladki Bahin verification, halting benefits for ineligible women. Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: दीड लाख लाडक्या बहीण अपात्र, हफ्ता थांबला, चौकशीसाठी गर्दी

Massive Scrutiny in Marathwada: लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. प्रशासनाने लाभार्थ्यांच्या अर्जांची काटेकोर छाननी सुरु केली आहे. मराठवाड्यात दीड लाख लाडक्या अपात्र ठरल्यात

Girish Nikam

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र महिलांनी लाभ घेतल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळेच प्रशासनाने सर्वेक्षण सुरु केलं आहे. सर्वेक्षणानंतर अपात्र लाडक्यांवर मोठी कारवाई केली आहे. मराठवाड्यात तब्बल दीड लाखांहून अधिक महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे राज्यात पाहिल्यांदाच एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं महिलांना योजनेतून वगळण्यात आलं आहे. दुसरीकडे योजनेचा लाभ थांबलेल्या महिला बालकल्याण विभाग कार्यालयात चौकशीसाठी गर्दी करतायेत. त्यासाठी योजना कक्ष सुरू करण्यात आलाय.

राठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज अपात्र ठरलेत ते पाहूया... लाडकींवर सर्वात मोठी कारवाई

संभाजीनगर

एकूण अर्ज - 20,069

पात्र अर्ज - 15,206

अपात्र - 4,863

लातूर

एकूण अर्ज - 13,865

पात्र अर्ज - 9204

अपात्र - 4661

बीड

एकूण अर्ज - 23688

पात्र अर्ज - 18251

अपात्र - 5437

धाराशिव

एकूण अर्ज - 12293

पात्र अर्ज - 8138

अपात्र - 4155

हिंगोली

एकूण अर्ज - 11503

पात्र अर्ज - 7006

अपात्र - 4497

नांदेड

एकूण अर्ज - 23270

पात्र अर्ज - 15165

अपात्र - 8105

परभणी

एकूण अर्ज - 16414

पात्र अर्ज - 14027

अपात्र - 2387

मराठवाडा

एकूण अर्ज - 133335

पात्र अर्ज - 93007

अपात्र - 40228

कोणत्या कारणांनी अर्ज अपात्र ठरलेत...

अनेक लाडक्यांनी खोटी कागदपत्र सादर करून योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय. 65 वर्षाच्या वरील महिलांनी आणि 21 वर्षांच्या खालील तरुणींनीही सरकारी तिजोरीवर डल्ला मारलाय. एकाच घरात 3 जण योजनेचा लाभ घेत असल्याचंही उघड झालंय. अंगणवाडी सेविकांमार्फत झालेल्या सर्व्हेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एकट्या मराठवाड्यात दीड लाख लाडक्या अपात्र ठरल्यामुळे राज्यभरात हा आकडा आणखी वाढणार आहे. मात्र या सर्व्हेक्षणामुळे बोगस लाभार्थ्यांचा हप्ता थांबवण्यात आला असून गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, आणि शासनाच्या तिजोरीवरचा भार कमी होईल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

Attack On Shiv Sena Leader: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

Satara Fire : धाड धाड धाड...! साताऱ्यात भर बाजारपेठत एकावर गोळीबार, परिसरात भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: अजित पवारांवर टीका; आमदाराकडून संजय राऊतांची जीभ हासडण्याची भाषा

शनिशिगणापूरनंतर शिर्डीत ऑनलाईन गंडा,शिर्डी संस्थांनच्या नावानं बोगस वेबसाईट

SCROLL FOR NEXT