Marathwada Flood update  Saam tv
महाराष्ट्र

Marathwada Flood : मदतीच्या किटवर जाहिरातीबाजी, ठाकरेंचा शिलेदार पेटला; सत्ताधाऱ्यांवर केली जळजळीत टीका

Marathwada Flood news : मदतीच्या किटवर जाहिरातीबाजी केल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर टीका केली. संजय राऊत नेमकं काय म्हणाले? वाचा

Vishal Gangurde

मराठवाड्यातील पूरस्थिती गंभीर

सत्ताधाऱ्यांकडून मदतीच्या पिशव्यांवर फोटो छापल्यामुळे संजय राऊत यांची टीका

उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर

३६ लाख शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ठाकरे गटाचं उदिष्ट

Marathwada Flood update : मराठवाड्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. अनेकांचा मृत्यू देखील आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी केली जात आहे. त्यानंतर आज सत्ताधाऱ्यांकडून पुरग्रस्तांना मदत करण्यात आली. यावेळी फोटो आणि चिन्ह छापलेल्या पिशव्यांमधून मदत करण्यात आली. मात्र, हा निर्लज्जपणा असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली. 'लोक मरत आहेत आणि त्या मुडद्यांवर तुम्ही राजकारण करताय, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

संजय राऊत म्हणाले, 'काही लोक या परिस्थितीचा फायदा घेत आहेत. ते आपल्या दाढी आणि चेहऱ्याचे फोटो टाकून मदतीचं राजकारण करत आहेत. हे प्रचाराचं राजकरण करणे निर्लज्जपणा आणि अमानुषपणाचं आहे'.

'एकीकडे लोक मरत आहेत. त्यांचा आक्रोश सुरु आहे. पण हे निर्दयपणे काम करणारे सरकर आहे. प्रत्येक ठिकाणी पैशांची मस्ती दाखवताहेत. आता एवढीच पैशांची मस्ती असेल, तर सरकारी मदतीवर स्वत:चे फोटो लावण्याऐवजी घरातील तिजोऱ्या रिकाम्या कराव्यात. ठेकेदारांकडून लुटलेले पैसे, नगरविकास खात्याने समृद्धी महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पातून लुटलेले पैसे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोकळे करावेत, असंही संजय राऊत पुढे म्हणाले.

संजय राऊत ट्विट करत म्हणाले की, 'मराठवाड्यावर अस्मानी संकट कोसळलंय. मात्र, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही. जनतेचा आक्रोश सरकारच्या दरबारी पोहोचवण्याचं काम विरोधीपक्ष नेत्याकडून केले जाते. मात्र, राज्याला दोन दोन बिनकामाचे उपमुख्यमंत्री मिळालेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेता नाही. ही आपल्या लोकशाहीसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे'.

उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या म्हणजे गुरुवारी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. ३६ लाख शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचावा लागेल, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Maharashtra Politics : भाजपमध्ये अल्पसंख्याक सेल का? व्होट जिहादच्या आरोपावर मनसेचा खोचक सवाल

Crime News: पुणे, बीडनंतर आता लातूरमध्ये गुंडाराज;भरचौकात तरुणावर तलवारीनं हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Jio Special Offer: सासू सुनेचा राडा ते सस्पेन्स ड्रामा; १ रुपयात ३० फुलऑन दिवस मनोरंजन

Paneer Recipe : पनीर बिर्याणी अन् मटर पनीर खाऊन कंटाळलात? मग 'ही' चटपटीत रेसिपी एकदा ट्राय कराच

SCROLL FOR NEXT