MNS workers confront a teacher at a private coaching class in Nashik following allegations of insulting Marathi students. Saam Tv
महाराष्ट्र

‘गावठी, मॅनर्सलेस’; परप्रांतीय शिक्षकाकडून मराठी विद्यार्थ्यांचा अपमान, मनसैनिक कोचिंग क्लासमध्ये पोहोचले, पुढे काय घडलं? VIDEO

Marathi Students Insulted By Teacher In Nashik Coaching Class: नाशिकमधील खासगी कोचिंग क्लासमध्ये मराठी विद्यार्थ्यांचा आणि मराठी भाषेचा अपमान केल्याचा प्रकार समोर आला आहे. संतप्त विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी थेट क्लासमध्ये जाऊन शिक्षकाच्या कानशिलात लागावली.

Omkar Sonawane

मराठी-अमराठी वाद पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. नाशिकमध्ये हिंदी भाषेची सक्ती आणि मराठी भाषेचा अवमान केल्याचा आरोप करत मनसेने थेट खासगी क्लासमध्ये घुसून मनसेस्टाईलने उत्तर दिले आहे. शहरातील शरणपूर रोड परिसरातील एका खासगी क्लासमध्ये हा प्रकार घडला. या क्लासमध्ये मराठी भाषेत बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना एका शिक्षकाने “गावठी आणि मॅनर्सलेस” असे संबोधल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी थेट मनसेच्या कार्यालयात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित क्लासमध्ये जाऊन त्या शिक्षकाला चोप दिला.

नेमकं काय घडलं?

सदर खासगी क्लासमध्ये बहुतेक शिक्षक हे परप्रांतीय असून, हिंदी भाषेचा वापर सक्तीने केला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येत होत्या. मात्र, लाख-दोन लाख रुपयांचे शुल्क भरले असल्याने पालकांकडे तक्रार करणे किंवा क्लास सोडणे विद्यार्थ्यांना शक्य नव्हते. त्यामुळे सर्व अडचणी सहन करत विद्यार्थी नियमितपणे क्लासला जात होते.

दरम्यान, एकदा विद्यार्थी आपसात मराठी भाषेत बोलत असताना एका शिक्षकाने त्यांना कोणती भाषा बोलत आहात, असा प्रश्न केला. विद्यार्थ्यांनी मराठी असल्याचे सांगताच, शिक्षकाने “इथे हिंदी बोलायची, मराठी भाषा आणि मराठी लोक गावठी व मॅनर्सलेस असतात” असे म्हणत मराठी भाषेचा अपमान केला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयात जाऊन आपली आपबिती सांगितली. तक्रार मिळताच मनसे कार्यकर्ते थेट क्लासमध्ये पोहोचले आणि संबंधित शिक्षकाला कानशिलात लगावत जाब विचारला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष ललित वाघ,मनविसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमेश भोई,बाजीराव मते,मनविसे उपजिल्हाध्यक्ष नितीन धानापुणे,मनविसे शहर संघटक अक्षय कोंबडे,मनसे शहर संघटक मनविसे विभागअध्यक्ष रोहित उगावकर,मेघराज नवले,मनोज सावंत,मयुर पाटील,दर्शन बोरसे,मयुर जैन,मोहित मनसे विभाग उपाध्यक्ष सागर भागवत,आदी महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Romantic Place: १४ फेब्रुवारी करा खास! नाशिकपासून २० किमीवर बायकोसोबत फिरा या नयनरम्य ठिकाणी

Maharashtra Live News Update: कल्याण डोंबिवलीच्या महापौर हर्षला थविल चौधरी यांनी कल्याण डोंबिवली शहरात डीप क्लिनिंग मोहिमेला सुरुवात केली

SA vs AFG: धकधक वाढवणाऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय; दुसऱ्या सुपर ओव्हरमधील अखेरच्या चेंडूवर गेम पलटला

पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं; भरतीवेळी तरुणाचा मैदानातच मृत्यू

Teeth Cleaning Tips: पिवळे दात पांढरे करण्यासाठी घरगुती उपाय काय?

SCROLL FOR NEXT