काही वेळापूर्वी झालेल्या अपघाताचा परिणाम
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
काही वेळापूर्वी एका डंपर ने पेट घेतल्यामुळे बंगलोर मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली होती
फायरिंगसाठी वापरलेले शस्त्र जप्त
मुंबई क्राइम ब्रांचने अटक आरोपीकडून शस्त्र हस्तगत केले. याच पिस्तूलाने घरावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले शस्त्र फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे (FSL) बॅलिस्टिक चाचणीसाठी पाठवण्यात आले. तपास करून हे सिद्ध केले जाणार आहे की जप्त केलेल्या शस्त्रातूनच रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला.
मुलुंड पोलिसानी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.मिलन रोड बिल्डटेक कंपनी चे प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान , प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ, डिप्युटी डायरेक्टर सौरभ सिंग, सुपरवायजर प्रशांत भोईर आणि डीबी हिल एलबीजी कंपनी चा प्रोजेक्ट मॅनेजर अवधुत इनामदार यांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांना पुन्हा मुलुंड कोर्टात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
टिटवाळा येथील स्टेशन रोडवर एका कंटेनरने नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा वाढदिवस मुंबईतील त्यांच्या पालखी बंगल्यात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी योगेश कदम यांच्या मातोश्रींनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली.
धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता, यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, त्याचबरोबर मंत्री जयकुमार रावल यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्रूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मोठ्या प्रमाणात शिवरायांचा जयघोष करण्यात आला आहे, त्याचबरोबर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनवेळी देखील महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा जयघोष करण्यात आला आहे.
अजित दादांच्या आवाजातले एआय व्हिडिओ समाज माध्यमातून चालवू नका...
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रसिद्धी पञक काढून केलं आवाहन
यापुढे अजितदादांच्या आवाजातले एआय व्हिडिओ टाकल्यास कायदेशीर कारवाईचाही दिला इशारा
थोर महापुरुषांचा इतिहास शिकवणारे पुस्तक बदलण्यात आल्यावरून देखील शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे, जे थोर महापुरुष होऊन गेले त्यांचा इतिहास पूर्वी तिसरी चौथीच्या पुस्तकाच्या माध्यमातून शिकवला जायचा, परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वी कोणाच्या डोक्यात काय सुपीक कल्पना आली माहित नाही, परंतु ते पुस्तकच बदलण्यात आले असल्याची खंत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली आहे.
नाशिकच्या मुक्तीधाम परिसरात महिलांच्या डब्यात बुरखा घालून फिरणाऱ्या व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात संबंधित व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे समोर आले. वेडाच्या भरात हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या त्याच्यावर संभाजीनगर येथील मानसिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सातारा–पुणे हायवेवरील जांभूळवाडी येथील नवीन बोगद्याजवळ आज दुपारी भीषण अपघात झाला. पाच ते सहा वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
हिंगोली जिल्ह्यातील हट्ट गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ पुष्पाक देशमुख या तरुणाने शंभर फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले. स्थानिक प्रशासनाने चुकीची माहिती दिल्याचा त्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले असून तरुणाला सुखरूप खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेस कडे आहे. राष्ट्रवादी मात्र सत्ताधाऱ्यांच्या सुरात सूर मिसळत असल्याने काँग्रेस अधिक आक्रमक. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे यांना काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी फटकारले. महापालिकेच्या सभागृहामध्ये बोलताना शिंदे म्हणाले आम्हाला अक्कल शिकू नका, तुम्ही काय करताय ते बघा
सोलापूर जिल्ह्यात केळी फळाचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. नातेपुते परिसरातील आज फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी थेट केळी उत्पादक शेतकऱ्याच्या बांधावर जात केळी बागेची पाहणी केली. फलोत्पादन विभागामार्फत केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजनांबद्दल आढावा घेतला. . केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या . व त्यांना शेती दरम्यान येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या .
भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र ऑलिपिक असोसिएशन यांच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या यांच्या वतीने महाराष्ट्र केसरीचे आयोजन
६८वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कीताबाच्या लढत या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न होत आहे.
स्पर्धेचे उदघाटन दिनांक १८ मार्च रोजी सायं. ६.०० वाजता होणार असुन बक्षिस समारंभ दिनांक २२ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे.
या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील ४२ शहर / जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने एकुण ८४० कुस्तीगीर गादी व माती विभागामध्ये सहभागी होणार असुन त्यांच्या समावेत १०० तांत्रिक अधिकारी ८४ संघ व्यवस्थापक व ८४ कुस्ती कोच या स्पर्धेत सहभागी होत आहे.
सालाबादप्रमाणे स्व. पै. मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी कीताब विजेत्या कुस्तीगीरास १ कीलो चांदीची गदा देण्यात येणार असुन उर्वरीत सर्व प्राविण्यधारक कुस्तीगीरांना रोख स्वरूपामध्ये बक्षिस देण्यात येणार आहे.
रामकृष्ण कर्तव्य फाऊंडेशन वाघोली, संस्थापक/अध्यक्ष रामकृष्ण सातव पाटील,सदस्य पुणे बाजार समिती यांच्या वतीने आयोजन करण्यात येणार आहे.
मनमाड- मालेगाव वाहतूक कोंडी...
सुमारे 20 किमी पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा ...
सुमारे तीन तासपासून वाहतूक ठप्प...
वाहतूक पोलिसांच्या हलगर्जीपणा मुळे वाहतूक झाली ठप्प...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान याचे सोबत केल्याने राज्यभरात भाजप कडून आंदोलन करण्यात आलीत. बुलढाण्यातही जयस्तंभ चौकात परवा बुलढाणा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे शहराध्यक्ष चंद्रकांत बरदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून घोषणाबाजी केली हे आंदोलन बिना परवानगी जमाव जमवून घोषणाबाजी केली म्हणून पोलिसांनी या सर्व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल झाल्याने भाजप च्या गोटात खळबळ उडाली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा रामभरोसे कारभार...
मध्य प्रदेश आणि गुजरात सीमेवर मद्य तस्करी जोरात; तपासणी नाके बनले शोभेची वस
कर्मचारी नाक्यावरून गायब
शहादा, अक्कलकुवा आणि नवापूरमधील चेकपोस्टवर शुकशुकाट तर उभ्या वाहनांवर साचली धूळ
भिवंडी महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीला वेगळे वळण
भाजपने उमेदवार बदलला
स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाची घोषणा
लातूर शहराततील विद्यार्थ्याच्या खून प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत मुसक्या आवळल्यात, न्यायालयाने आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर आज शिवाजीनगर पोलिसांनी आरोपींची घटनास्थळापर्यंत धिंड काढली आहे. दरम्यान शहरातील गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवल्यात.
* गु.र.क्र. 180/2026 अन्वये वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
* भा.न्या.सं. 2023 कलम 318(4), 316(2), 61(2) अंतर्गत कारवाई
* 2023 ते डिसेंबर 2024 दरम्यान फसवणुकीचा प्रकार
* फिर्यादी बाळू बबन शेटे व इतरांकडून 72,93,000 रुपये उकळले
* घर देण्याचे आश्वासन देऊन ऑनलाइन व रोख रक्कम स्वीकारली
* बांधकाम करूनही घराचा ताबा न दिल्याचा आरोप
* आशा झेमने, नंदू झेमने, यज्ञा झेमने, अविनाश भांजी, करण किराड, मुर्तुजा भावनगरवाला यांच्यावर गुन्हा
* या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्राजक्ता पवार या करत आहे
* वरिष्ठांच्या आदेशानुसार 17 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा नोंद
* वर्सोवा पोलिसांकडून पुढील तपास सुरू
मालेगावच्या महापालिकेत गोंधळ!
मालेगावच्या महापालिकेची पहिलीच सभा वादळी
टिपू सुलतानच्या फोटोवरून झालेला वाद उफाळला
राष्ट्रवादी विलगीकरणावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल म्हणाले की अजित दादाच्या निधनानंतर आम्हाला याच्यातून सावरायचे आहे..आम्हाला विलगीकरणावर कोणतीही चर्चा करायची नाही अशी स्पष्ट भूमिका प्रफुल पटेल यांनी मांडली
तसेच आमच्या पक्षाच्या बाबत अनेक लोकांनी अनेक अफवा पसरवले आहेत परंतु येणाऱ्या 26 तारखेला विधिमंडळाची नेते, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी ह्याच राहतील असे स्पष्ट आज प्रफुल पटेल यांनी गोंदिया येथे केले.
सातारा नगरपरिषदेच्या वतीने उद्या होणाऱ्या शिवजयंती कार्यक्रमात ‘अघोरी नृत्य’ या सादरीकरणाचा समावेश करण्यात आल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने तीव्र आक्षेप घेतला आहे. विज्ञानवादी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणदिनानिमित्त अशा प्रकारचा कार्यक्रम घेणे योग्य नसून तो तातडीने रद्द करावा, अशी मागणी अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली आहे.निवेदनात आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनीही नगरपरिषदेला तत्काळ सूचना देऊन हस्तक्षेप करावा, असे म्हटले आहे.अंनिसने नमूद केले की, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्यातून उभ्या राहिलेल्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यातील अघोरी आणि अमानुष प्रथा विरोधी कायद्याच्या अस्तित्वात अशा कार्यक्रमाचे आयोजन लांछनास्पद आहे.या मागणीपत्रावर उदय चव्हाण, दीपक माने, वंदना माने, भगवान रणदिवे आणि शंकर कणसे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
मी त्या दिवशी अजित पवार यांना कोणत्याही खासगी फाईलासाठी फोन केला नव्हता. शेतकऱ्यांसाठी फोन केला होता, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. विलीनिकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
यवतमाळ येथील रेमंड यूको डेनिम प्रा.लि. कारखान्यातील कामगारांनी वेतनवाढ व इतर प्रलंबित मागण्यांसाठी लोहारा एमआयडीसी परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण न झाल्याने हा निर्णय घेतल्याचे कामगार सांगतात.व्यवस्थापनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा कामगार नेत्यांनी दिला. परिसरात तणाव वाढला असून प्रशासन सतर्क झाले आहे.
लोहगाव-वाघोली रस्त्यावर एका शेडमध्ये (गोडाऊन +सर्व्हिस सेंटर) आगीची घटना, पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकूण सहा वाहने दाखल. आग विझवण्याचे काम सुरू
महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांच्यावर हल्ला करत गाडी फोडली
बदलापूर पोलीस ठाण्याच्या बाहेर घडला प्रकार
भाजपा स्वीकृत नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा संशय
आळंदी येथील घुंडरे गल्ली परिसरात गणेश ( Alandi Accident News) मंगल कार्यालया समोर छोटा टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून पडलेल्या एका व्यक्तीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पुणे महानगरपालिकेकडून अनाधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू..
अतिक्रमण विभाग प्रमुख सोमनाथ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अनधिकृत बांधकाम कारवाईचा धडाका
बाणेर सुसखिंड बीडीपी झोन मध्ये अनधिकृत कच्चे पक्के बांधकाम कारवाई सुरू
कोल्हापुरातील सासणे कॉलनी परिसरात तरुणाकडून घरावर तलवारीने हल्ला..
काही दिवसांपूर्वी याच कॉलनीमध्ये काही तरुणांकडून वाहनांची तोडफोड केली होती..
आज पुन्हा एकदा भरदिवसा तलवारीने हल्ला..
पूर्व वैमनस्यातून हल्ला असण्याची प्राथमिक माहिती..
भरदिवसा तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न..
कल्याण फरकपाडा परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खाजगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉय ने जवळपास 60000 रुपयाचे पार्सल खडकपाडा परिसरातील नेहमीच्या ठिकाणी दोन गोण्यांमध्ये भरून ठेवले होते. याचवेळी काही संधी साधू चोरटे त्याच्या मागावर होते . या चोरट्यांनी संधी साधत यामधील पार्सलने भरलेली एक गोणी उचलून पळ काढला .ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत या प्रकरणी खडकपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत .
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा कथित अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर दाखल गुन्ह्याला एक वर्ष पूर्ण झाले असतानाही अद्याप चार्जशीट दाखल न झाल्याने वाद पुन्हा चिघळला आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप करत या प्रकरणात जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा दावा केला आहे.
श्रीनाथ भीमाले यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या श्रीनाथ भीमाले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
स्थायी समितीचे 16 पैकी 12 सदस्य भाजपचे असल्याने भीमाले यांची निवड केवळ औपाचरिकता
महापौर मंजुषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल
मुळशीत रिंग रोड कामादरम्यान भीषण दुर्घटना – डंपर घरावर पलटला, दोन महिलांचा मृत्यू
मुळशी तालुक्यात सुरू असलेल्या रिंग रोडच्या कामादरम्यान आज एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.
रस्त्याच्या भरावाचे काम सुरू असताना एक डंपर चालकाचा ताबा सुटून थेट एका घरावर पलटला.
या भीषण अपघातात घरात असलेल्या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.
पोलिस,अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, रिंग रोडचे काम सुरू असताना सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि जड वाहनांची बेफिकीर वाहतूक हे या अपघातामागचे कारण असू शकते. मात्र, याबाबत अधिकृत चौकशी सुरू आहे.
रोहित पवारांनी अजित पवारांचा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवली आहे. रिपोर्ट यायला एवढा उशिर का लागतोय, २ दिवसात रिपोर्ट येऊ शकत होता, व्हीएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला आहे.
अजित दादांच्या अपघात झालेल्या विमानाचे ब्लॅकबॉक्स जळाले आहेत. त्यावरुन रोहित पवारांनी शंका व्यक्त केली आहे. कागद जळाले नाही पण ब्लॅकबॉक्स कसा जळाला, असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला आहे.
DGCA च्या निकषांपेक्षा दृश्यमानता कमी होती. अशा परिस्थिती विमान उतरवलंच का, विमान पुन्हा मुंबईला का नाही आणलं, असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले आहेत. अजितदादांचा अपघात हा घातपात असल्याने रोहित पवारांचे म्हणणे आहे.
अपघातामागे विम्याचं कारण आहे का, विमानासाठी २१० कोटींचा विमा उतरवण्यात आला होता. आता पायलटला किती पैसे मिळणार, असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेक प्रश्न विचारण्यात आले आहे. अजितदादांचं विमान मुद्दाम आदळण्यात आलं असल्याचे रोहित पवारांनी म्हटलं आहे.
आमदार रोहित पवारांची पत्रकार परिषद सुरु झाली आहे. यामध्ये त्यांनी अजितदादांच्या अपघाताबाबत शंका व्यक्त केली आहे.
पुण्यातील बुधवार पेठेतून ११ बांगलादेशी महिला ताब्यात
बोगस आधार कार्ड आणि कागदपत्रांच्या आधारे करत होत्या बुधवार पेठेत वास्तव्य
पुणे पोलिसांची बुधवार पेठेत मोठी कारवाई
अनधिकृतपणे वास्तव करून कुंटणखान्यात करत होत्या काम
फरासखाना पोलिसांची बुधवार पेठेत छापेमारी
एकूण २२ महिलांना ताब्यात घेऊन त्यातील ११ या बांगलादेशी असल्याचे तपासातून समोर
कामठी येथे बाजार परिसरातील मुख्य मार्गावर नगरपरिषद प्रशासनाकडून विशेष अतिक्रमण हटाव मोहीम.
शहरात अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून नागरिकांकडून नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी केल्या जात आहेत.
शहीद स्मारक चौक ते गांधी मंच तसेच शिवाजी चौक ते न्यू कामठी पोलिस स्टेशन या मार्गावर पथकाने गस्त घालत कारवाई केली.
रस्त्यावर उभारलेली तात्पुरती शेड, हातगाड्या आणि इतर साहित्य हटविण्यात आले.
संबंधितांना रस्त्यावर दुकाने न लावण्याची सक्त ताकीद देण्यात आली.
नागरिकांनी सातत्यपूर्ण आणि कडक अंमलबजावणीची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यावरून आता अल्पसंख्याक आयोग ऍक्शन मोड मध्ये
अल्पसंख्याक आयोगाने विभागाला नोटीस बजावत 7 दिवसात उत्तर सादर करण्याचे दिले निर्देश
अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी बजावली नोटीस
अल्पसंख्याक विभागाने उत्तर सादर केल्यावर त्यावर पुढील कारवाई केली जाणार
काल उपसचिवांची बदली केल्यानंतर आता अल्पसंख्याक आयोगाचे दिले चौकशी आदेश
कोकणातल्या पहिल्या टप्प्यातील आंब्याला केवळ दहा टक्केच फळ धारणा
नोव्हेंबर महिन्यात आलेल्या आंब्याच्या मोहराला फळधारणा नाहीच
थंडीमध्ये 80 ते 90 टक्के आंब्याच्या झाडांना आला होता मोहर
सततचं धुके, ढगाळ हवामान, तर कधी जास्त थंडी यामुळे मोहर पडला काळा
दुसऱ्या टप्प्यातील आंब्याच्या झाडांना सध्या मोहराची प्रक्रिया सुरू
पहिल्या टप्प्यात दहा टक्के पेक्षा सुद्धा कमी फळधारणा झाल्याने आंबा बागायतदार संकटात
मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील कोकणातल्या घटलेल्या आंब्याच्या उत्पादनावर चर्चा
भिगवण प्रकरणात गोपीचंद पडळकर यांची आज होणाऱ्या सभेला पुणे ग्रामीण पोलिसांनी नाकारली परवानगी
तणाव निर्माण होऊ नये तसेच उद्या शिवजयंती असल्यामुळे पोलिसांनी सभेसाठी परवानगी नाकारली
गेले पाच दिवस करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सुरू असलेली दानपेट्यांची मोजणी काल पूर्ण झाली. गेल्या दोन महिन्यांत आलेल्या भाविकांनी तब्बल दोन कोटी एकवीस लाख पस्तीस हजार ५२६ रुपयांचे दान देवीच्या चरणी अर्पण केले.
अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, अॅडोब, पावलो अल्टो नेटवर्कस् यांसारख्या जागतिक कंपन्यांमध्ये भारतीय वंशाचे सीईओ आहेत आणि आता चॅनेलच्या सीईओसुद्धा कोल्हापूर (महाराष्ट्र) मधील आहेत. भारत केवळ जागतिक नवोन्मेषात सहभागी होत नाही, तर अशा ठिकाणी नेतृत्व करतो, असे गौरवोद्गार फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काढत कोल्हापूरच्या कन्येचा आवर्जून उल्लेख केला. त्यांनी लीना नायर यांचा उल्लेख केला ते जागतिक नेतृत्वाचे उदाहरण म्हणून. त्या उल्लेखाने कोल्हापूरच्या कन्येने जागतिक पातळीवर कर्तृत्वाचा ठसा कसा उमटवला आहे, याचा दाखला काल मुंबईत झालेल्या इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन फोरममध्ये मॅक्रॉन यांनी दिला. कोल्हापूरच्या मातीत घडलेल्या कन्येच्या प्रेरणादायी वाटचालीवर प्रकाश पडला.
महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील कृष्णा नदीवरील शेवटचा बंधारा असलेल्या राजापूर बंधाऱ्यावर तातडीने पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी स्वाभिमानी युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्ष बंडू पाटील यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यात पंचायत समितीच्या सभापतीपदावरून सुरू असलेला भाजप-शिवसेना वाद अद्याप मिटलेला नाही.भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे आणि शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या आकांक्षा चौगुले यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरूच आहे.भुसनी गणातून भाजपकडून विजयी झालेले कैलास शिंदे तर केसर जवळगा गणातून शिवसेनेकडून निवडून आलेल्या आकांक्षा चौगुले हे दोघे ही सभापती पदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. महायुतीमध्ये दोघांनाही अडीच-अडीच वर्षांची संधी देण्याचा फॉर्म्युला चर्चेत आला असला तरी पहिली संधी कोणाला मिळणार यावरून पेच निर्माण झाला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार स्थानिक पातळीवर बैठका सुरू असून पक्षश्रेष्ठीकडेही याबाबतचा वाद पोहचल्याची माहिती आहे.उमरगा पंचायत समितीमध्ये निवडून आलेले भाजपचे सात सदस्य मुंबईच्या सहलीवर आहेत.
- गंभीर आजारांचा मागोवा शक्य
- एम्स नागपूर आणि आयआयटी बॉम्बे यांचा संयुक्त पुढाकार घेतला आहेय...
- आवाजातील स्वर, कंपन, लय, गतीतील बदलांचे विश्लेषण, नैराश्य, श्वसनविकार, पार्किन्सनसारख्या न्यूरोलॉजिकल आजारांचे संकेत शोधणार
- ध्वनिनियंत्रित खोलीत रुग्णांकडून ठरावीक मजकूर वाचन, प्रगत अल्गोरिदमद्वारे सूक्ष्म नमुन्यांचे विश्लेषण होणार
- पारंपरिक तपासण्यांपेक्षा जलद, कमी खर्चिक पद्धत, ग्रामीण आणि संसाधनअभावी भागांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान ठरणार
- मोबाईल, टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्मशी जोडण्याची शक्यता....
धाड परिसरात गुंडगिरी करून सामान्य नागरिकांच्या मनात आपली दहशत निर्माण करणारे काही टवाळखोरांनी एका मेडिकल संचालकास मारहाण करत हप्ता मागितला होता.. पोलिसांकडे तक्रार प्राप्त होताच हप्तेखोर गॅंगमधील 3 आरोपींची धाड पोलिसांनी गावातून धिंड काढून जनतेच्या मनात निर्माण झालेली धास्ती मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.. दुधा येथील पवन राजेंद्र सोनुने यांनी धाड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्यांना धाड येथील चार जणांना अडवून व्यवसाय करायचा असल्यास आम्हाला हप्ता द्यावा लागेल असे म्हणत मारहाण केली होती.. तर याच आरोपींनी इतर हॉटेल चालकांना देखील हप्त्याची मागणी केली होती, मात्र तक्रार दाखल नाही.. या गँगची हिंमत वाढत असल्याने ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी कठोर पावले उचलत अक्षय बिलांगे, रोशन शिंदे, राहुल दळवी या तिघांना अटक करून त्यांची गावातून धिंड काढली, यामुळे नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे...
- विद्यमान सरपंचांनाच प्रशासक नेमण्याचा शासनाचा विचार, सदस्यांनाही प्रशासकीय समितीत सहभागी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं राज्य सरकारचे म्हणणे...
- संबंधित ग्रामपंचायतीचा कारभार सुरळित चालण्यासाठी सरपंचाच्या मदतीने प्रशासकीय समितीही स्थापन केली जाणार ...
- ग्रामपंचायतीवरील प्रशासक आणि प्रशासकीय समितीचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असणार
- मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात सुनावणी, २३ जानेवारी २०२६ च्या शासन परिपत्रकावर अंतरिम स्थगिती
- निवडणुका न घेता प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला आव्हान, न्या. अनिल किलोर आणि न्या. राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी
यवतमाळ जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपण्यावर आला आहे त्यामुळे जिल्हा परिषद कडून प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यातच आता ग्रामविकास विभागाने जानेवारी ते डिसेंबर 2026 पर्यंत मुदत संपणाऱ्या आणि नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे चार मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार असून निवडणूका दिवाळीत होईल अशी शक्यता आहे.
महाडचे ग्राम दैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाची आज मध्यरात्री सांगता होणार आहे. महाशिवरात्री पासून या उत्सवाला प्रारंभ झाला आहे. मंदिरात धार्मिक विधी, देवी देवतांच्या पालखींच आगमन सुरू आहे. आज संध्याकाळी महाड तालुक्यातील विवीध देवी देवतांच्या पालख्या वीरेश्वर मंदिरात येतील. यासोबत लाखोंचा भक्त समुदाय देखील महाड शहरात दाखल होणार आहे. या निमित्ताने मिठाई, प्रसादची दुकान, खेळणी, शोभिवंत वस्तुंची दुकान आणि उंचउंच आकाश पाळणे देखील महाडमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे महाड शहराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा जत्रोत्सव म्हणून महाडच्या छबिना उत्सवाची ओळख आहे.
तळोदा शहरातील काकशेठ गल्ली जवळ रात्री भीषण प्रसंग घडला. विद्युत ट्रान्सफॉर्मला अचानक आग लागली. परिसरात काही क्षणांकरिता भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि विजेचा पुरवठा तातडीने बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. रात्री दरम्यान अचानक खांबावरून ठिणग्या उडू लागल्या आणि काही क्षणांतच डिपीतून धूर व ज्वाळा निघू लागल्या नागरिकांनी तत्काळ माती आणि वाळू टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात एक अनोखी घटना घडली आहे. राज्य शासनाच्या नवीन अध्यादेशाचा आधार घेऊन पहिल्यांदाच बिगर राजकीय (पक्षविरहित) व्यक्तीने स्वीकृत नगरसेवक पदासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. या अर्जाचा आधार घेत ॲड. प्रियांका पिसे यांनी महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे हा अर्ज सुपूर्द केला आहे.
खवले मांजराचे खवले आणि सांबर प्राण्याच्या शिंगांसह दोघे जेरबंद
मंचर वनपरिक्षेत्राच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मोरडे फूड्स कंपनीजवळ सापळा रचून दोघांना अटक केली
आरोपींकडून सुमारे ३ किलो खवले मांजराचे खवले, तीन नखे, चार सांबर शिंगे आणि स्विफ्ट डिझायर गाडी जप्त करण्यात आली आहे
दोघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरात उद्या मध्यवर्ती भागातून मिरवणुका काढण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता
त्यामुळे लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता तसेच परिसरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक वाढून कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत
गुरुवारी सकाळी सात पासून सायंकाळी गर्दी संपेपर्यंत मध्यवर्ती भागात वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.