Narayan Rane And Uddhav Thackray Saam Tv
महाराष्ट्र

शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही, उद्धव ठाकरेंनी आता गप्प बसून आराम करावा; नारायण राणेंचा हल्लाबोल

द्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही, असं नारायण राणे म्हणाले.

साम टिव्ही ब्युरो

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग: शिवसेनेतील (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड करत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असल्याचे बोलले जात आहे. यावरुन आता राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज भाजपचे नेते नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

'शिवसेनेवर उद्भवलेल्या परिस्थितीला उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव जबाबदार आहेत. आज शिवसेनेचे अस्तित्व संपले असून, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना (ShivSena) पुन्हा उभी राहणार नाही. या सर्वांला संजय राऊत जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी आता गप्प बसून आराम करावा अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने कोणते प्रश्न सोडवले असा सवाल उपस्थित करत नवीन सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच लोक कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी काम करेल असा विश्वासही नारायण राणे यांनी व्यक्त केला. आज राणे (Narayan Rane) यांनी सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधला.

नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची मानसिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे आता त्यांनी तोंड गप्प करावे, ज्यांना मुख्यमंत्री असतानासुद्धा स्वतःचे आमदार सांभाळता येऊ शकले नाही ते मतदार काय सांभाळणार ? असा टोलाही राणे यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जनतेचे कुठले प्रश्न सोडवले हे सांगावे, उलट नारायण राणेंच्या घरांला नोटीस बजाविण्याचे काम त्यांनी केले आहे, असंही राणे (Narayan Rane) म्हणाले.

'अडीच वर्षांमध्ये स्वतःच्या आमदार, खासदारांना आठ-आठ तास भेटण्यासाठी तात्कळत ठेवायचे, त्यांची कामे करायची नाहीत. केवळ मातोश्रींच्या आप्तांचीच कामे करायची हा एक कलमी भ्रष्टाचार त्यांनी केला. आपण वेळोवेळी महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे सांगत होतो. कारण मला आधीच याची कल्पना होती. आता शिवसेनेच्या (ShivSena) चिन्हावरून उभा राहिलेला प्रश्न कायद्याच्या बाबींवर अवलंबून आहे. येत्या ११ तारखेला होणाऱ्या निर्णयानंतर पुढील हालचाली घडतील, असंही राणे म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी नितेश राणे यांना मंत्रिपद मिळेल का असा प्रश्न विचारला यावर बोलताना राणे म्हणाले, नव्या मंत्रिमंडळाची यादी शिंदे आणि फडणवीस दिल्लीला घेऊन गेले आहेत. मी विरोधीपक्ष नेता होतो तेव्हा सभागृहात माझा दरारा होता. आपण सभागृहामध्ये शिस्त ठेवली होती, असंही राणे म्हणाले. यावेळी राणे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे आभार मानले.

एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावरही यावेळी राणे यांनी टोला लगावला. 'आपण अनेक प्रवक्ते बघितले आहेत. त्यापैकी केसरकर एक आहेत. केवळ प्रश्न विचारणे आणि उत्तरे देणे हा त्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे केसरकर हे प्रवक्ते म्हणूनच राहोत असा टोला राणे (Narayan Rane) यांनी केसरकर यांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT