Raj-Uddhav Thackeray Rally Invitation saam tv
महाराष्ट्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava: पहिलीच्या इयत्तेपासून हिंदी शिकवण्यात यावी, .या शासन निर्णय झाल्यानंतर राज-उद्धव ठाकरे यांच्याकडून विजयी मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्याची निमंत्रण पत्रिका व्हायरल झालीय.

Bharat Jadhav

वरळी डोममध्ये उद्या ठाकरी बंधूंचा विजयी मेळावा होणार आहे. या मेळाव्याची निमंत्रण पत्रिका आता समोर आलीय. या निमंत्रण पत्रिकेवर कार्यक्रम स्थळ, पदाधिकारी आणि निमंत्रक म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नावे आहेत. निमंत्रण पत्रिकेवर 'आवाज मराठीचा कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचाच अजेंडा' असे लिहिलेले आहे.

उद्याच्या या मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. याचबरोबर, लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांच्या बातमीची दखल घेतली जात आहे. गुरुवारी ठाकरे बंधूंच्या मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला होता. त्यातून विरोधकांना घाम फुटला होता. टीझर येताच सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर प्रतिक्रिया दिल्या जात होत्या. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तर राज्यातील राजकारण बदलणार असल्याची शक्यता निर्माण झालीय. शनिवारी होणाऱ्या मेळाव्यात दोन्ही बंधू कदाचित युतीची घोषणा करू शकतील.

वाघ नेमकी कुणाची शिकार करणार?

२००५ ला ठाकरे घराण्यात उभी फूट पडली. राज ठाकरेंनी नवीन पक्ष काढला, वाढवला, सुरूवातीला निवडणुका जिंकल्या. पण यश हे कायम राहिलं नाही. अगदी तसेच उद्धव ठाकरेंसोबतही घडलं. राज ठाकरेबाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी महापालिका राखल्या. युती आघाडी करत सत्ता मिळवली. पण नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना पराभव सहन करावा लागला.

राज ठाकरेंच्या पक्षालाही दारूण पराभव या निवडणुकांमध्ये स्वीकारावा लागला. त्यामुळे ठाकरे ब्रँड राहिल की संपेल, अशीच भिती त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटू लागली. त्यानंतर दोन्ही बंधू एकत्र येत असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. दोन भाऊ एकत्र आल्यास त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर मुंबई महापालिकेत मराठी मतांचं विभाजन टळेल.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह संभाजीनगरमध्ये मनसेची ताकद आहे. शहरी भागांमधील ठाकरे गट आणि मनसेच्या ताकदीचा एकत्रित फायदा होईल. उद्धव ठाकरेंचं संघटन आणि राज ठाकरेंच्या भाषणशैलीचा फायदा होण्याची शक्यता. पण जर वेगळे लढले तर महायुतीला फायदा होण्याची शक्यता जास्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Ganeshotsav Bus : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, गणेशभक्तांच्या बसचा आधी टायर फुटला; नंतर पेट घेतला, क्षणात...

Xiaomi Redmi Note 15 Pro लाँच, प्रीमियम कॅमेरा आणि दमदार फिचर्स, किंमत किती?

Budh Gochar 2025: गणेश चतुर्थीपासून चमकणार 'या' २ राशींचं नशीब; बुध ग्रहाच्या गोचरमुळे बसणार धन

Shatataraka Nakshatra : कुंभ राशीचे रहस्य; शततारका नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

SCROLL FOR NEXT