maratha samaj rasta roko andolan in parbhani saam tv
महाराष्ट्र

Maratha Andolan In Parbhani : मराठा समाजाचा परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता राेकाे, गावक-यांचा अन्नत्याग

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सरकार पावले उचलत नसल्याने ग्रामीण भागामध्ये मराठा तरुणांकडून बेमुदत उपोषण या सारखे आंदाेलन छेडले जात आहे.

राजेश काटकर

Parbhani News :

मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मागणीसाठी आणि मराठा आंदाेलक मनोज जरांगे- पाटील (manoj jarange patil) यांच्या समर्थनार्थ आज (शनिवार) परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा समाजाने रास्ता रोको, चक्काजाम आंदोलन केले. यामुळे बहुतांश भागातील वाहतूक विस्कळीत झाली हाेती. (Maharashtra News)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकल मराठा समाज सेलू तालुकाच्या वतीने हादगाव पावडे, मोरेगाव, देवगाव फाटा, गोगलगाव पाटी, रेल्वे गेट सेलू , वालूर, कुंडी पाटी, राजवाडी पाणी फिल्टर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर बैल व बैलगाडी सोडून चक्काजाम करण्यात आले. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या आंदाेलनात सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

याबराेबरच चारठाणा फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे दोन तास वाहतुकीवर परिणाम झाला. चारठाणा जिंतूर रोडवरील वाहतूक विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले.

गावकऱ्यांचा पाठिंब्यासाठी अन्नत्याग

पालम तालुक्यातील पोखर्णी देवी येथील किशोर कदम, विठ्ठल कदम व संजय कदम गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे- पाटील यांची देखील तब्येत खालावत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरक्षणासाठी सरकार पावले उचलत नसल्याने ग्रामीण भागामध्ये मराठा तरुणांकडून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले जात आहे. मराठा समाजाचा अंत पाहू नये तात्काळ आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

दरम्यान आज पाचव्या दिवशी मराठा समाजाच्या शेकडो महिलांसह पुरुषांनी एक दिवस अन्नत्याग करून या बेमुदत उपोषणामध्ये सहभाग नोंदवला. आरक्षण आमच्या हक्काचं, एक मराठा लाख मराठा, एकच मिशन ओबीसीतून आरक्षण अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shantanu Naidu Girlfriend : रतन टाटांचा विश्वासू शांतनु नायडूकडून प्रेमाची कबुली; फोटोतील तरुणी आहे तरी कोण?

Maharashtra Live News Update:आयुष कोमकर खूनप्रकरणी २ जणांना अटक तर १३ जणांवर गुन्हा

Pune Metro : पुणे मेट्रो सुसाट! २४ तासांत तब्बल ६ लाख जणांचा प्रवास, गणेशोत्सवात मेट्रोची कोट्यवधींची कमाई

Coconut Chikki Recipe :घरीच १० मिनिटांत बनवा खोबऱ्याची चिक्की, मिळेल मार्केटसारखी चव

Ankita Walawalkar : सलमान खानच्या 'Bigg Boss 19' मध्ये अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT