maratha samaj rasta roko andolan at parli beed highway today saam tv
महाराष्ट्र

Maratha Andolan At Parli Beed Highway : मराठा आंदाेलकांनी परळी- बीड महामार्ग रोखला; पिंपळनेरमध्ये बंद

Maratha Reservation : परळी, माजलगाव, गेवराई आणि बीड तालुक्यातील विविध भागात हे आंदोलन सुरू आहेत. यावेळी आंदाेलकांनी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.

विनोद जिरे

Beed News :

मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मागणीसाठी आणि मराठा आंदाेलक मनोज जरांगे- पाटील (manoj jarange patil) यांच्या समर्थनार्थ राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज (शनिवार) बीड जिल्ह्यात आणि तालुक्यातील गावा गावांत मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले. (Maharashtra News)

बीडच्या घाटसावळी आणि पिंपळनेरमध्ये गावामध्ये मराठा बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बीडच्या घाटसावळीमध्ये गावातून जाणारा बीड -परळी महामार्ग (beed parli highway) आंदाेलकांना राेखला. पिंपळनेर गाव बंदची घोषणा मराठा बांधवांनी दिली.

गेल्या अर्ध्या तासापासून हा महामार्ग अडवण्यात आल्यानं वाहतूक खोळंबली आहे. वाहनांच्या लांबचं लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये आज देखील आंदोलन सुरू असल्याचा चित्र पाहायला मिळतंय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परळी, माजलगाव, गेवराई आणि बीड तालुक्यातील विविध भागात हे आंदोलन सुरू आहेत. यावेळी आंदाेलकांनी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात ‘नरेंद्र सरेंडर’ आंदोलन

Beed: बायोलॉजीच्या पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट, नातेवाईकांनी बांबूच्या सहाय्याने पुरवल्या कॉपी; VIDEO व्हायरल

Daily Wear Blouse Designs: रोज घालण्यासाठी 5 ब्लाऊज डिझाईन कोणते?

४० हून अधिक गुन्ह्यांतील फरार सराईत चोर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

Bird Death Warning: मृत्यूचे संकेत देतात हे पक्षी; तुम्हालाही दिसत असतील तर व्हा सावध

SCROLL FOR NEXT