maratha samaj rasta roko andolan at latur beed highway today
maratha samaj rasta roko andolan at latur beed highway today Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Andolan: मराठा आंदाेलकांचा रास्ता राेकाे, 3 तासांपासून लातूर-बीड महामार्गावरील वाहतुक खाेळबंली

Siddharth Latkar

- संदीप भाेसले / विश्वभूषण लिमये

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज (गुरुवार) सकाळपासून मराठा समाजाने लातूर बीड महामार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन छेडले आहे. परिणामी लातूर बीड महामार्गावरील वाहतूक खाेळंबली आहे. दरम्यान दूसरीकडे बार्शी तहसील कार्यालयासमोर उपाेषणास बसलेल्या आंदाेलकाची तब्येत ढासळल्याची माहिती समाेर आली आहे.

मराठा आरक्षण आणि सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करत आज लातूर जिल्ह्यातील मराठा समाज लातूर बीड महामार्गावर आला. यावेळी आंदाेलकांनी रास्ता राेकाे आंदाेलन केले. यामुळे महामार्गावर लांबच्या लांब रांगा लागल्या. सुमारे अडीच तासांपाूसन सुरु असलेल्या या आंदाेलनामुळे लातूर बीड महामार्गावरील वाहतुक खाेळंबली आहे.

मराठा बांधवाची बार्शित तब्येत खालवली

साेलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे मराठा आरक्षणासाठी सलग सहाव्या दिवशी मराठा बांधवाचे आमरण उपोषण सुरु आहे. आज उपोषणकर्ते आनंद काशीद या मराठा बांधवाची तब्येत खालावली. आनंद काशीद यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिला. काशीद यांच्या आंदाेलनस्थळी प्रांताधिकारी तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांनी भेट दिली हाेती मात्र काशीद हे उपोषणावर ठाम राहिले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates: जरांंगेंच्या मराठवाडा दौऱ्यापूर्वी अशोक चव्हाण, संदिपान भुमरे यांनी घेतली भेट

Viral Video : '२९ पैकी २९ जागा दिल्या तरी गावात रस्ता नाही'; महिलेने थेट PM मोदींकडे मागितली मदत, व्हिडिओ व्हायरल

विद्यार्थ्यांच्या गणवेशावरुन Eknath Shinde आणि Ambadas Danve यांच्यात जुंपली!

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना दिलासा; रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट करणे या महिन्यापर्यंत असणार निशुल्क

Girls Student: आनंदाची बातमी! व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुल्कात मोठी सवलत; ५० टक्क्याऐवजी १०० टक्के शिक्षण शुल्क माफ

SCROLL FOR NEXT