maratha reservation youth ended her life nanded District hadgaon taluka  Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपवलं जीवन; नांदेडच्या घटनेनं राज्यभरात खळबळ

Nanded Maratha Reservation News: मराठा आरक्षणासाठी सुनील बाबुराव कावळे या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता नांदेड जिल्ह्यातही अशाच प्रकारची एक दुर्देवी घटना घडली आहे.

Satish Daud

Nanded Maratha Reservation News

मराठा आरक्षणासाठी सुनील बाबुराव कावळे या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता नांदेड जिल्ह्यातही अशाच प्रकारची एक दुर्देवी घटना घडली आहे. हदगांव तालुक्यातील वडगाव येथील एका तरुणाने शनिवारी रात्री विष प्राशन करत आपली जीवनयात्रा संपवली आहे.  (Latest Marathi News)

शुभम सदाशिव पवार असं मृत तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभमनच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण मिळावं, अशी मागणी शुभमने केली आहे. आरक्षणासाठी मराठा आंदोलकाने आत्महत्या केल्याची ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे.

या घटनेमुळे मराठा आंदोलक संतप्त झाले असून आंदोलन आणखीच तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. फक्त तुम्ही आत्महत्या करु नका, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केलं आहे.

जर पोरंच मरायला लागले तर आरक्षण द्यायचं कुणाला? असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपत आला आहे. त्यामुळे मनोज जरांगे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांनी मंत्रिमंडळात चर्चा करुन येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा मराठ्यांसोबत खेटणं तुम्हाला महागात पडेल, असा इशाराही जरांगे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक संजय केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

SCROLL FOR NEXT