Maratha Reservation: अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा आरक्षण रखडले; चिखलीकरांचा आरोप  Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा आरक्षण रखडले; चिखलीकरांचा आरोप

महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप

भारत नागणे

पंढरपूर: महाविकास आघाडी सरकारने (government) मराठा समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप करत, जोपर्यंत अशोक चव्हाण मराठा आरक्षण (Maratha Reservation) उपसमितीच्या अध्यक्षपदावर आहेत. तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असा टोला ही भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना लगावला आहे.

हे देखील पहा-

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्याच्या छत्रपतींना जर उपोषण करण्यासाठी बसावे लागत असेल तर ही महाराष्ट्रासाठी (Maharashtra) दुर्दैवाची बाब आहे. अशोक चव्हाणांनकडून (Ashok Chavan) मराठा समाजाचा (Maratha Reservation) भ्रमनिरास झाला आहे, अशी टीका देखील खासदार पाटील यांनी यावेळी केली आहे.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर आज पंढरपूरात (Pandharpur) विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आले होते. मराठा आरक्षण आणि भ्रष्टाचारी (Corruption) मंत्री यावरून महाविकास आघाडी सरकारवर ही त्यांनी टीका केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bmc Election Result: मुंबईत कोणाची सत्ता? कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर? जाणून घ्या

राज ठाकरेंचं इंजिन सुसाट! राज्यात मनसेने खातं उघडलं, 2 उमेदवारांचा दणदणीत विजय|VIDEO

Maharashtra Elections Result Live Update : पुण्यातला पहिला निकाल भाजपच्या बाजूने, भाजपचे ३ उमेदवार विजयी

Dandruff Remedy: डॅंड्रफ होईल रातोरात गायब फक्त फॉलो करा या ४ स्टेप्स

Mahanagarpalika Elections Result Live: ना ठाकरे, ना भाजप...मुंबईत काँग्रेसनंच उघडलं पहिलं विजयाचं खातं, शेवाळेंना दणका

SCROLL FOR NEXT