पुणे: समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे हे परत एकदा अडचणीमध्ये सापडले आहेत. २ समाजामध्ये (community) तेढ निर्माण करत समाजाच्या भावना भडकवल्या प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर परत एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद एकबोटे यांच्याबरोरबच पतीत पावन संघटनेचे स्वप्नील नाईक यांच्याबरोबर इतर २० जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात (Pune) फरासखाना पोलीस (Police) स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
काल महाशिवरात्री (Mahashivaratri) निमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. असाच एक कार्यक्रम कसबा पेठ येथील पवळे चौकात देखील आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमात रितसर परवानगी न घेता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच या कार्यक्रमामध्ये बेकायदेशीर जमाव जमवत २ समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पुणे पोलिसांनी (Police) यावेळी दिली आहे.
हे देखील पहा-
याप्रकरणी पुण्यामधील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये एकूण २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये १५ जणांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. मात्र, अद्याप मिलिंद एकबोटे यांना अटक झाली नसल्याचे माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, गेल्या २ महिन्याअगोदरच खडक पोलिस स्टेशनमध्ये मिलिंद एकबोटे यांच्यवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यात नातूबाग येथे १९ डिसेंबरला शिवप्रताप दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे बरोरबच इतर ६ जणांविरोधात खडक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद एकबोटे, मोहनराव शेटे, दीपक बाबुलाल नागपुरे, कालीचरण महाराज, कॅप्टन दिग्रेंद्र कुमार आणि नंदकिशोर रमाकांत एकबोटे या ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता परत एकदा मिलिंद एकबोटे अडचणीत सापडले आहेत.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.