Russia-Ukraine crisis Live: रशिया- युक्रेन युद्धाच्या दरम्यान आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

युक्रेनमधील विद्यार्थ्यांना भारतात आणण्याकरिता परोपरीने प्रयत्न केले जात आहेत
Russia-Ukraine crisis Live: रशिया- युक्रेन युद्धाच्या दरम्यान आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Russia-Ukraine crisis Live: रशिया- युक्रेन युद्धाच्या दरम्यान आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यूSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: रशिया- युक्रेन यांच्यात चांगलेच युद्ध पेटले आहे. या दरम्यान युक्रेनमधील विद्यार्थ्यांना भारतात आणण्याकरिता परोपरीने प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये विद्यार्थी भारत सरकारकडे मदतीची (Indian Students) मागणी करत आहे. यादरम्यान आज आजून एका भारतीय (Indian) विद्यार्थ्याचा रशियाने केलेल्या हल्ल्यात (attack) मृत्यू झाला आहे. यानंतर आता आणखी एक बातमी समोर आली आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये (Ukraine) आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू (student ) झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील अनेक दिवसांपासून तो आजारी होता. त्यातमध्येच त्याचा मृत्यू झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून तो आजारी होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तरुणावर रुग्णालयामध्ये (hospital) उपचार सुरू होते. रशिया- युरोप युद्धाच्या दरम्यान नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा खार्किव्ह शहरात मृत्यू झाल्याची दुखद बातमी काल समोर आली आहे.

Russia-Ukraine crisis Live: रशिया- युक्रेन युद्धाच्या दरम्यान आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
दुर्दैवी! शौचालयाची टाकी साफ करताना पडून 4 तरुणांचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना (पहा Video)

या घटनेमुळे संपूर्ण भारतावर शोककळा पसरली आहे. युक्रेनमध्ये अद्याप शेकडो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. या दरम्यान, नवीनच्या मृत्यूआधी त्याचं त्याचा जवळचा रुममेट आणि मित्र असलेल्या श्रीकांत चन्नेगौडा याच्याशी फोनवर बोलणं झाले होते. त्यावेळी नवीनने आपण सुपरमार्केटमध्ये खाण्याकरिता काहीतरी घ्यायला आलो असल्याची माहिती दिली होती, असे श्रीकांतने सांगितले आहे.

त्यानंतर १० मिनिटांनी श्रीकांतने जेव्हा परत नवीनला फोन केला तेव्हा एका युक्रेनियन महिलेने फोन उचलला होता. ती जीवाच्या आकांताने रडत होती. यानंतर रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याचे श्रीकांतने रडतरडत सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com