Manoj Jarange Patil Chagan Bhujbal  Saam tv
महाराष्ट्र

Manoj jarange Patil: 'भुजबळ विश्वासघातकी माणूस, फडणवीसांनी त्यांचा डाव ओळखावा...' जरांगे पाटलांचा पलटवार; काय म्हणाले?

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चर्चा झाली. यावेळी छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले. भुजबळांच्या या टीकांना मनोज जरांगे पाटील यांनीही सडेतोड उत्तर दिले असून छगन भुजबळ हे विश्वासघातकी असल्याची टीका त्यांनी केली.

डॉ. माधव सावरगावे

Manoj Jarange Patil News:

राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे. काल अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चर्चा झाली. आरक्षणावरुन राज्यात सुरू असलेल्या मराठा- ओबीसी संघर्षावर विरोधक- सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जवळपास पाऊणतास सभागृहात त्यांचे मत मांडले. यावेळी त्यांनी मनोज जरांगेवर जोरदार टीका केली. भुजबळांच्या या टीकांना मनोज जरांगे पाटील यांनीही सडेतोड उत्तर दिले असून छगन भुजबळ हे विश्वासघातकी असल्याची टीका त्यांनी केली.

काय म्हणाले जरांगे पाटील?

" छगन भुजबळ यांच्या पोलिसांनी गोळी मारली जाईल, असा अहवाल दिल्याचा दावा केला होता. त्यांच्या या आरोपाला उत्तर देताना जरांगे पाटलांनी "अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर झुंडशाही म्हणत असाल तर त्याचे विचार किती प्रगलब आहे हे कळते. गावागावात आंदोलन उभे करायचे, कोयत्याची भाषा करायची, कोण तुला गोळी मारणार? असा टोला भुजबळांना लगावला.

तसेच ठकोण तो पोलीस सांगणार गोळी मारणार म्हणून? नाशिक, वाशिम, जळगाव, हिंगोलीत आम्हाला अनेक अडचणी आल्या,आम्ही सांगितल नाही. आम्हीच हताळले. आमच्या जीवाला धोका असा रिपोर्ट पोलिसांनी का दिलं नाही मग?" असा सवालही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी यावेळी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विश्वासघातकी माणूस...

"आमच्या दौऱ्याला पोलीस संरक्षण मिळत नव्हते. ३०, ३० किलोमीटर पोलीस नसायचे. याला (भुजबळ) स्वतः वरची केस मागे घ्यायची आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी याचा डाव समजला पाहिजे, हा विश्वास घातकी माणूस आहे. सरकार विरोधात सामान्य माणसाचा रोष वाढायला लागला..." असेही ते म्हणाले.

मराठा तरुणांवर अन्याय...

"फक्त क्लिप व्हायरल केली म्हणून मराठा तरुण अनेक महिन्यांपासून आतमध्ये आहे. एवढं काय केलं त्यांनी? त्याचे ऐकून तुम्ही मराठ्यांवर अन्याय करू लागले, हे माध्यमांतून घराघरात दिसून येत आहे.." असा आरोपही जरांगे पाटील सरकावर केला यांनी केला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; माजी महापौर करणार ठाकरे गटात प्रवेश

Winter Fashion Tips :हिवाळ्यात Cool अन् Cozy लूक हवाय? 'या' फॅशन टिप्स फॉलो करा, प्रत्येकजण तुम्हाला पाहून वेडा होईल

satyanarayan vrat 2024: सत्यनारायणाची पूजा करायचीय? या महिन्यातील हा दिवस शुभ, जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

Kanguva Movie Review: दमदार ॲक्शनवाला सूर्या आणि बॅाबी देओलचा 'कांगुवा ' प्रदर्शित, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट जाणून घ्या

Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

SCROLL FOR NEXT