Omraje Nimbalkar Criticized Laxman Hake  saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: ...तर त्या नेत्यांवर बहिष्कार टाकू, लक्ष्मण हाकेंच्या धमकीला ओमराजे निंबाळकरांचे उत्तर; पाहा VIDEO

Omraje Nimbalkar Criticized Laxman Hake: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांना लक्ष्मण हाके यांनी धमकी दिली होती. त्यांच्या या धमकीला ओमराजे निंबाळकर यांनी प्रत्युत्तर दिले.

Priya More

Summary -

  • लक्ष्मण हाके यांच्या बहिष्काराच्या धमकीला ओमराजे निंबाळकरांनी प्रत्युत्तर दिलं.

  • 'हाके काहीही बोलतात, त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही', अशी टीका त्यांनी केला.

  • जीआर अंमलबजावणी प्रामाणिकपणे व्हावी, नाहीतर पुन्हा असंतोष निर्माण होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

लक्ष्मण हाके यांच्या धमकीला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. लक्ष्मण हाके काहीही बोलतात त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. ते काहीही म्हणतील, अशी टीका ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. ज्या नेत्यांनी मनोज जरांगेंना पाठिंबा दिला त्या नेत्यांवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला होता.

लक्ष्मण हाके यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे. ते काहीही म्हणतील. लक्ष्मण हाके यांना तुम्ही विचारा ज्या वेळेस एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई येथून गुलाल उधळून परत पाठवलं. त्यावेळेस नेमका कोणता शब्द दिला होता. लक्ष्मण हाके यांनी एकनाथ शिंदे यांना विचारलं पाहिजे होते की तुम्ही कशातून आरक्षण देण्याचा शब्द दिला होता?, असे विधान ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यामागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. पाचव्या दिवशी त्यांनी उपोषण सोडले होते. मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाला अनेक मराठा समजाच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी पाठिंबा दिला होता. धाराशिवचे आमदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यावरूनच लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

ओमराजे निंबाळकर सरकारवर निशाणा साधत सांगितले की, 'मनोज जरांगे पाटील यांना पूर्वी दिलेलं वचन सरकारने पाळलं नाही त्यामुळेच पुन्हा त्यांना सरकारच्या विरोधात उपोषणाला बसावे लागले. अपेक्षा एवढीच आहे की कुठलाही समाज आंदोलन करताना पोटतीडकीने आणि अपेक्षेच्या भावनेने आंदोलन करतो. त्याच धारणेतून मराठा समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला होता. हा समाज स्वयंस्फूर्तींनी आणि स्वखर्चाने रस्त्यावर उतरला होता. कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप घेऊन हे आंदोलन नव्हतं.'

तसंच, 'गरजवंत मराठ्यांच्या मुलांनी त्यांना येत असलेल्या अडचणीमुळे उचललेले हे पाऊल होतं.आनंद आहे की सरकारने त्याला साकारात्मक प्रतिसाद दिलाय. परंतु ज्या काही गोष्टी सरकारने हा जीआर काढून मान्य केल्या आहेत त्याची अंमलबजावणी सुद्धा तितक्याच प्रमाणिकपणे व्हावी. पुन्हा फसवल्याची भावना निर्माण होऊ नये याची दक्षता सरकारने घ्यावी.', असे देखील ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT