Maratha Reservation  Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation : सायरन वाजवत अँब्युलन्स आली अन् रोखलेला मार्ग क्षणात केला मोकळा; मराठा समाजाकडून माणुसकीचं दर्शन

Maratha Reservation Protest : पुणे नाशिक महामार्गावर मराठा आंदोलकांनी महामार्ग रोखला आहे. त्यामुळे मोठी वाहतुककोंडी झाली आहे. मात्र आंदोलकांनी माणुसकीचं दर्शन घडवत वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली.

Sandeep Gawade

Maratha Reservation

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलनाला सुरूवात केली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली. राज्यात अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आला आहे. तसेच सलग दुसऱ्या दिवशी देखील एसटी बससेवा ठप्प आहेत. दरम्यान पुणे नाशिक महामार्गावर मराठा आंदोलकांनी महामार्ग रोखला आहे. त्यामुळे मोठी वाहतुककोंडी झाली आहे. मात्र आंदोलकांनी माणुसकीचं दर्शन घडवत वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे आंदोलकांचं कौतुक होत आहे.

पुणे नाशिक महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठबळ मिळावं यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी महामार्गावर एक तासांपासून मोठी वाहतुककोंडी निर्माण झाली आहे. यावेळी मनोज जरांगेपाटलांच्या आव्हानाचे स्वागत करून आंदोलनातून आंदोलकांनी माघार घेत थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाला येताना मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन यावा, अन्यथा मराठा समाज्याच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बीड जिल्ह्यात रास्ता रोको

मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मागणीसाठी आणि मराठा आंदाेलक मनोज जरांगे- पाटील (manoj jarange patil) यांच्या समर्थनार्थ राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज (शनिवार) बीड जिल्ह्यात आणि तालुक्यातील गावा गावांत मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले. (Maharashtra News)

बीडच्या घाटसावळी आणि पिंपळनेरमध्ये गावामध्ये मराठा बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बीडच्या घाटसावळीमध्ये गावातून जाणारा बीड -परळी महामार्ग (beed parli highway) आंदाेलकांना राेखला. पिंपळनेर गाव बंदची घोषणा मराठा बांधवांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT