Maratha Reservation Latest Update Manoj Jarange Patil Serious Allegations Against Shinde Fadnavis government Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: सरकारने माझा जीवच घ्यायचं ठरवलंय, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; दिला शेवटचा अल्टिमेटम

Manoj Jarange Health Updates: सरकारने माझा जीवच घ्यायंच ठरवलंय, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. दोन वर्षे मी सरकारसोबत तहच करतोय, त्यांनी आमच्या पदरात काहीच टाकलं नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Satish Daud

Maratha Reservation Latest News: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस असून सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत तसूभरही मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. (Latest Marathi News)

घशात इन्फेक्शन आणि शरीरात ताकद राहिली नसल्याने जरांगे यांनी नीट बोलताही येत नाहीये. जरांगे यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचं एक पथक तातडीने उपोषणस्थळी हजर झालं. त्यांनी जरांगे यांना सलाईन लावत त्यांच्यावर प्राथामिक उपचार केले. दरम्यान, या उपचारानंतर जरांगे यांनी साम टीव्हीसोबत संवाद साधला.

यावेळी त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. सरकारने माझा जीवच घ्यायंच ठरवलंय, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. दोन वर्षे मी सरकारसोबत तहच करतोय, त्यांनी आमच्या पदरात काहीच टाकलं नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्य सरकारच्या मनात काय चाललंय, हे माहित नाही, आम्ही फक्त आशेवर आहोत, असंही ते म्हणाले.

दरम्यान, जरांगे यांनी राज्य सरकारला मराठ्यांचा कुणबीत समावेश करण्यासंदर्भात जीआर काढण्यासाठी ४ दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. त्यानंतर पाण्याचाही त्याग करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. दुसरीकडे जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मंत्र्यांचं शिष्टमंडळ जरांगेंच्या उपोषस्थळी गेले होते.

मात्र गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे यांच्या शिष्टमंडळाला जरांगेंचं मन वळवण्यात अपयश आलं. सरकार लवकरात लवकर जीआर काढणार असल्याचं आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजनांनी जरांगेंना दिलं आहे. त्यावेळी संदीपान भुमरे यांनी जबाबदारी स्वीकारली. मात्र, तरी देखील जरांगे मागे हटले नाहीत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २,५०० जादा एसटी बस , ४०० गाड्या फुल

Success Story: युट्यूब आणि Google वरुन अभ्यास; क्रॅक केली स्पर्धा परीक्षा; पहाडिया समाजातील लेक होणार प्रशासकीय अधिकारी

Wednesday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; प्रेमात वाद होणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

SCROLL FOR NEXT