Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा इशारा

Maharashtra Rain News: पावसाची आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात येत्या २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Good News For Farmers IMD predicts heavy-rainfall in maharashtra next 24 hours
Good News For Farmers IMD predicts heavy-rainfall in maharashtra next 24 hoursSaam TV

Maharashtra Rain Latest Updates: पावसाची आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात येत्या २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत. यामुळे पुढील ५ ते ७ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Good News For Farmers IMD predicts heavy-rainfall in maharashtra next 24 hours
Asia Cup 2023 IND vs PAK: भारत-पाकिस्तान सुपर-४ फेरीतील सामना रद्द होणार? समोर आलं मोठं कारण...

भारतीय हवामान विभागाकडून (Weather Updates) याबाबतची माहिती देण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. पाण्याअभावी खरीप हंगामातील पिके करपून चालली असून बळीराजा संकटात सापडला आहे. दुबार पेरणी करून सुद्धा पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलंय.

अशातच हवामान खात्याने येत्या २ ते ३ दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवली आहे. पुणे घाट विभागात दोन दिवस यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

Good News For Farmers IMD predicts heavy-rainfall in maharashtra next 24 hours
Kunbi Certificate: कुणबी-मराठ्यांच्या नोंदी शोधा, मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश; हैदराबादमधून काय माहिती मागवणार?

मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

सप्टेंबर महिन्या सुरू झाला, तरी देखील मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही मुसळधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशातच दिलासादायक पाऊस कधी पडेल, याची सर्वजण आस धरून बसले आहेत. आता हवामान खात्याने पुढील ३ दिवस मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

आज म्हणजेच ६ सप्टेंबर ते ९ सप्टेंबरच्या कालावधीत मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात हलका, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक ८ ते १४ सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाला थोडासत्र दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासोबत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com