Devendra Fadnavis On Manoj Jarange x
महाराष्ट्र

Maratha Protest : आरक्षणावर तोडगा निघणार? वर्षा बंगल्यावर फडणवीस, पवार अन् शिंदेंमध्ये आज खलबतं

Maratha Reservation Manoj Jarange : वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही बैठक घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पाणीही पिणार नसल्याचं सांगितलं आहे, कारण सरकारने अद्याप मागण्यांवर ठोस तोडगा काढलेला नाही.

Namdeo Kumbhar

  • मराठा आरक्षणावर आज वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक होणार

  • मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व पवार उपस्थित राहणार

  • मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड, उपोषण तीव्र

  • आजच तोडगा निघण्याची शक्यता, संपूर्ण राज्याचं लक्ष मुंबईकडे

CM Devendra Fadnavis Maratha Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर आज महत्त्वाची खलबतं सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत तोडगा काढण्यासाठी चर्चा होणार आहे. (Will government announce Maratha reservation today?)

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. आजपासून आपण पाणीही पिणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. चार दिवसांपासून मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकलेले आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. सरकारकडूनही यावर तोडगा काढण्यासाठी पावले उचलण्यात येत आहे. आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांमध्ये चर्चा होणार आहे. रविवारी रात्रीच यावर चर्चा होणार होती, पण काही कारणास्तव रद्द करण्यात आली. आज बैठक होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणावर आज तोडगा निघणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहेत आजचा चौथा दिवस त्यांच्या अमरण उपोषणाचा असल्याने मराठा बांधव मैदानामध्ये यायला सुरुवात झाली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे आजचा दिवस राजकीय घडामोडींना खूप महत्त्वाचा असणार आहे.

रविवारी रात्री वर्षा निवास्थानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक होणार होती. परंतु काही कारणास्तव ही बैठक रद्द झाली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावातून तातडीने मुंबईकडे निघाले होते . मात्र ती बैठक आज होण्याची शक्यता आहे. आज तिन्ही नेते बैठक घेऊन मराठा आरक्षण आंदोलनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचे सूत्रांची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hero चा धमका! लाँच केली Activaहून स्वस्त स्कूटर, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही

EPFO Rule: मोठी बातमी! पैसे काढण्याच्या नियमात होणार बदल; सरकारच्या नव्या नियमामुळे ७ कोटी पीएफधारकांना होणार फायदा

कोकणात राज ठाकरेंना डबल धक्का, वैभव खेडेकरनंतर आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर

Ambad News : नदीच्या पुरात रस्ता बंद; रुग्णालयात नेता न आल्याने आजीच्या खांद्यावरच नातवाने सोडले प्राण, अंबड तालुक्यातील घटना

पोलिसांच्या व्हॅनवर चढून कपलचा धिंगाणा, एकमेकांना मिठ्या मारत शिवीगाळ अन्..., पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT