MLa Bachchu Kadu  Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Aarakshan: सरकारने हो म्हटल्यावर टोकाच्या भूमिकेकडे जाऊ नये; बच्चू कडूंचं आंदोलकांना शांततेचं आवाहन

MLa Bachchu Kadu : मराठा आंदोलकांना प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी शांततेचं आवाहन केलं आहे.

Bharat Jadhav

Bachchu Kadu appeals maratha protesters:

शांतेत चालू असलेलं राज्यातील मराठा आरक्षण आंदोलन आता तीव्र झालंय. मराठा समाजाचे आंदोलक संतप्त झाले असून ठिकाठिकाणी जाळोपोळ केली जात आहे. हे आंदोलन आता भरकटू लागलं आहे. संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांना प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. (Latest News)

घर जाळू नये, कार्यालय पेटू नये, ती आपली संपत्ती आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला १० हत्तीच बळ मिळालं आहे. त्यामुळे आता त्याला वेगळं वळण देऊ नये, अशी नम्र विनंती आहे. सरकारने आरक्षणाला नाही म्हटलं नाही त्याला थोडा वेळ लागेल,सरकारने हो म्हटल्यावर कार्यकर्त्यांनी टोकाच्या भूमिकेकडे जाऊ नये , असं आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केलंय. दरम्यान आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू हे रक्तदान करणार आहेत. सिंदखेडराजा येथे ते रक्तदान करणार असल्याची माहिती स्वत: त्यांनी दिलं.

बीडमध्ये सकाळी आमदार प्रकाश सोळंके यांच्या वाहनाला पेटवल्यानंतर काही आंदोलकांनी माजलगाव येथील नगरपरिषदेच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली. आता शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला आग लावल्याची घटना घडलीय. छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची मराठा आंदोलकांना तोडफोड केलीय. त्यानंतर काही अनेक आमदार आणि खासदारांच्या निवसास्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी मराठा आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. मराठा आंदोलकांना आवाहन करताना कडू म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला १० हत्तीच बळ मिळालं आहे. त्यामुळे आता त्याला वेगळं वळण देऊ नये. जरांगे पाटील यांनी आता उपोषण थांबवावं. वेळ पडली तर पुन्हा दोन दिवसानंतर पुन्हा तारीख जाहीर करावी आणि सरकारला वेळ द्यावा.

जरांगेची प्रकृती ठीक राहावी आणि आंदोलन शांत रहावे यासाठी आणि सरकारने गंभीरपणे दखल घ्यावी. यावेळी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळावरही भाष्य केलं. कार्यक्रमात झालेल्या गोंधळ ह्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. त्या उद्रेक करतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांसभेत असा प्रकार घडला असेल, असे बच्चू कडू म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT