मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. बीडमधील माजलगावात या आंदोलनाला मोठं हिंसक वळण लागल्यानंतर सर्वत्र आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि छगन भुजबळ यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलीय. (Latest News)
आज सकाळी मराठा आंदोलकांनी बीडमधील आमदार प्रकाश सोळंके यांच्या वाहने पेटवून दिली. यानंतर आमदार-खासदारांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय. भुजबळ फार्मबाहेरीलही बंदोबस्त वाढवण्यात आलाय. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या नेतृत्वाखाली पोलीस तैनात करण्यात आलाय.. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेरीलही संरक्षण वाढवण्यात आलीय. मराठवाड्यामध्ये हिंसक आंदोलन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर इतर लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष कार्यालयाबाहेर ही बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाने आता उग्ररूप घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बीडमधील आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याला आग लावल्यानंतर आंदोलकांनी माजलगाव नगरपालिकेच्या इमारतीलादेखील आग लावली. मराठा बांधवांनी सोलापूर-पुणे महामार्गांवर टायर पेटवून केल आंदोलन केलं आहे.
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते व मराठा आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास कदम यांची छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खोडेगाव येथील गावकऱ्यांनी अंत्ययात्रा काढली.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला
मराठा आंदोलकाकडून राजकीय नेत्यांना लक्ष केलं जातंय. नांदेडमध्ये पोलिसांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवलाय. अशोक चव्हाण हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण उपसमितिचे अध्यक्ष होते. दरम्यान त्यांच्या निवास स्थानी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.