ST Bus  Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation : पुण्याहून मराठावाड्यात जाणाऱ्या ST बसेस रद्द, मराठा आंदोलनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

ST Buses Cancels for marathwada : एसटी बस वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

डॉ. माधव सावरगावे

Pune News :

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. कालपासून अनेक भागात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. मराठवाड्यात आंदोलन अधिक तीव्र होत असताना आंदोलकांनी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसना यावेळी टार्गेट केलं. कालच्या दिवसात जवळपास डझनभर बसेसचे या आंदोलनात नुकसान झालं आहे.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून एसटी महामंडळाने पुण्याहून मराठावाड्यात जाणाऱ्या बसेस रद्द केल्या आहेत. मराठवाड्यात आक्रमक आंदोलन सुरू असल्यानं शिवाजीनगरहून त्या भागात जाणाऱ्या आणि येणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. एसटी बस वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रविवारी दिवसभरात १२ बसेसची तोडफोड

मराठवाड्यात काल दिवसभरात १२ बस फोडल्याच्या घटना घडल्याने मराठवाड्यातील वेगवेगळ्या आगाराच्या ३ हजारांवर एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. आजही सकाळपासून अनेक ठिकाणी एसटी महामंडळाने खबरदारी म्हणून एसटीच्या काही फेऱ्या रद्द केल्या आहेत. (Latest Marathi News)

रविवारी जालन्यासह इतर जिल्ह्यांमध्ये मिळून १२ बसेसवर दगडफेक करण्यात आली. तर एकूण ३३३१ बसच्या फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. आज परिस्थिती पाहून बससेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

मात्र ज्या मार्गावर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे किंवा रास्ता रोको, आंदोलन होईल अशा मार्गावर ज्या फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यात बसच्या फेऱ्यावर परिणाम झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

SCROLL FOR NEXT