Maratha Reservation Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation: 'मनोज जरांगेंना ६ महिन्यांचा तुरुंगवास झाला पाहिजे'; सदावर्तें पुन्हा बरसले, मराठा आरक्षणावरही केलं भाष्य

Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जरांगेंना सहा महिन्यांचा तुरुंगवास झाला पाहिजे, अशी मागणी करतानाच मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणं शक्यच नसल्याचा पुनरुच्चार अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज केला.

Sandeep Gawade

Maratha Reservation

विचारांची लढाई विचाराने लढायला हवी, मात्र मनोज जरांगे पाटील खालच्या पातळीवर जाऊन मंत्री छगन भुजबळ आणि इतरांवर टीका करत आहे. त्यांच्या एकेरी भाषेतील विधानांमुळे आणि त्यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जरांगेंना सहा महिन्यांचा तुरुंगवास झाला पाहिजे, अशी मागणी करतानाच मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणं शक्यच नसल्याचा पुनरुच्चार अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज केला.

मनोज जरांगे पाटील त्यांच्या सभांमध्ये हुकूमशाहीची भाषा बोलत आहेत. गावबंदी करून, कोणाला मारून, गाड्या फोडून आरक्षण मिळत नाही. ते रोज याला बघून घेता, त्याला बघून घेतो अशा धमक्या देत आहेत. सरकारने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट आतापर्यंत सोयी सवलती दिल्या. पण जरांगे पाटील सर्वांची लायकी काढत निघाले आहेत. बेकायदेशी आंदोलन करण्याची तरतूद नाही, जरांगेंनी हे लक्षात ठेवावे असेही सदावर्ते म्हणाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे आणि असंविधानीक आरक्षणाच्या मागणीमुळे महाराष्ट्रात अशांतता निर्माण झाली आहे. याचा योग्य तपास झाल्यानंतर जरांगेपर्यंत नक्कीच पोहोचेल. त्यांनी किती कायदेशी ज्ञान आहे, हे आता लोकांना समजायला लागलं आहे. याविषयी आता बोलण्याची वेळ आली आहे. इंदापूरमध्ये आमदार गोपीचंद कडळकरांवर चप्पलफेक करण्यात आली, ही कोणत्या प्रकारची माणसिकता, कोणत्या प्रकारचे मागासलेपण असल्याचा सवाल सदावर्ते यांनी मनोज जरांगेंना केला आहे. भुजबळांचा अपमान करून देखील त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांना किमान ६ महिनेतरी तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT