बाळासाहेब ठाकरे यांनी गुजरात निवडणुकांवेळी "मोदी गया तो गुजरात गया," असं म्हणतं मोदींवर विश्वास दाखवला होता. मात्र आज याउलट परिस्थिती असून "आता मोदी आया तो देश गया" अशी स्थिती असल्याची थेट टीका संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी मोदी आणि अमित शहांवर सटकून टीका केली.
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकाण्याचे काम गुजरातच्या लॉबीने केलं. जेव्हा गुजरात, उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाकाळात मृत्युचे खच पडत होते, तेव्हा उद्धव ठाकरे लोकांचे जीव वाचवत होते. त्यांची लोकप्रियता यांनी खुपली म्हणून त्यांनी सरकार पाडलं. ज्यांनी माझ्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूपसला त्याच खंजिराने यांचा कोतळा काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शरद पवार समोर बसलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हा प्रश्न निवडणूक आयोगाला पडला. देशातील लोकशाही व्यवस्था संपत चालली आहे, हे आता जनतेच्या लक्षात येत आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही एका राज्यात बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन आव्हानही त्यांनी यावेळी सरकारला दिलं.
राम मंदिरावर बोलताना संजय राऊत म्हणाले, राम सगळ्यांचा आहे. केवळ भाजपचा नाही. ते रामाचे मालक नाहीत. पण त्यांनी रामाच्या नावाने राजकारण सुरू केले आहे. आज ज्या ठिकाणी राम मंदिर बनत आहे तिथे शिवसैनिक घुसले नसते तर आज राम मंदिर उभं राहिलं नसतं असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.