OBC leader Laxman Hake booked in Gevrai amid rising Maratha-OBC quota tensions. Saam tv
महाराष्ट्र

Laxman Hake: मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात गेवराईत गुन्हा दाखल

FIR Lodged Against OBC Leader Laxman Hake : मराठा-ओबीसी कोटा संघर्षात एक मोठा ट्विस्ट आला आहे. कारण गेवराईमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Bharat Jadhav

  • गेवराई येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात गुन्हा दाखल.

  • मराठा समाजाला ओबीसी दाखले देण्याच्या निर्णयामुळे वाद तीव्र.

  • सरकारच्या जीआरविरोधात ओबीसी नेते न्यायालयात जाणार.

मराठा समाजाला ओबीसी दाखले देण्यास सरकारने हिरवा कंदील दाखवलाय. त्यामुळे राज्यात मराठा-ओबीसी वाद सुरू झाल्याचं दिसत आहे. हैदराबाद गॅझेटियर लागू करत मराठा समजाला ओबीसी दाखले द्यावेत अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. सरकारने त्याची मागणी मान्य त्याबाबत जीआर काढलाय. यानंतर ओबीसी नेते आक्रमक झालेत. सरकारच्या जीआरविरोधात ओबीसी नेते न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

लक्ष्मण हाके देखील जागोजागी सभा घेत सरकारच्या निर्णयाचा विरोध करत आहेत. त्याचदरम्यान एक मोठी बातमी हाती आलीय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. जमाव जमवल्या प्रकरणी लक्ष्मण हाके आणि त्यांच्यासह समर्थकांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेवराईच्या बाग पिंपळगाव येथे हाकेंच्या नेतृत्वाखाली सभेचे आयोजन केलं होतं.

यावेळी गेवराईसह बाग पिंपळगाव येथे लक्ष्मण हाके यांनी समर्थकांनी जमाव जमा केला. वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी लक्ष्मण हाके यांच्या सभेदरम्यान जमाव जमा करून वाहतुकीस अडथळा केला. जमाव जमा केल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात १७ समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

Maharashtra Politics : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भेट;महापालिकेची रणनिती ठरली? VIDEO

Astrology: 'या'५ राशींवर होणार धनवर्षाव, द्विद्वाद योगामुळे होतील मोठे फायदे

Fact Check: २१ हजार गुंतवा १५ लाख मिळवा? काय आहे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

IND Vs UAE : भारताने यूएईचा धुव्वा उडवला, सामना २७ चेंडूंमध्ये संपवला; टीम इंडियाची विजयी सुरुवात

SCROLL FOR NEXT