Maratha Kranti Morcha  saam tv
महाराष्ट्र

Maratha Kranti Morcha : एक मराठा लाख मराठा ! आरक्षणासाठी परांड्यात मराठा समाजाचा महामाेर्चा

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हजाराे मराठा बांधव माेर्चात सहभागी झालेत.

साम न्यूज नेटवर्क

- कैलास चाैधरी

Maratha Kranti Morcha : मराठा समाजास ५० टक्क्याच्या आतील ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज परंडा शहरात सकल मराठा समाजाने महामोर्चा काढला. हजारो समाज बांधव या माेर्चात सहभागी झाले आहेत. (Maratha Reservation Latest Marathi News)

उस्मानाबाद (osmanabad) जिल्ह्यातील परंडा येथे मराठा आरक्षण महामोर्चाला शहरातील छञपती संभाजी महाराज चौकातुन सुरूवात झाली. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हजाराे माेर्चेक-यांनी (maratha kranti morcha) एक मराठा लाख मराठा अशा घाेषणा देत शहर दणाणून साेडले. या माेर्चात विद्यार्थ्यांसह युवक, युवती व अबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. (Maharashtra News)

मराठा आरक्षणासह (maratha reservation) विविध मागण्यांचे फलक हातामध्ये घेऊन समाज बांधव घाेषणा देताहेत. या माेर्चानंतर जाहीर सभा हाेणार आहे. या सभेत चार युवती उपस्थित मराठा समाज बांधवांनी मार्गदर्शन करणार आहेत. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पावसाला सुरुवात, पुणेकरांना तात्पुरता दिलासा

Kidney Stone Symptoms : पाठदुखी करू नका दुर्लक्षित, असू शकतो किडनी स्टोनचा धोका; डॉक्टरांनी सांगितली ४ गंभीर लक्षणं

कोरड्या त्वचेसाठी सर्वात भारी उपाय! 'दूध-हळदीचा' फेसपॅक

Tax free income: कोणकोणत्या कमाईवर सरकार टॅक्स लावत नाही?

ऑपरेशन टायगर फेल? उद्या मातोश्रीवर येतो; ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना निरोप?

SCROLL FOR NEXT