Maratha Kranti Morcha : ऐतिहासिक चित्रपट याेग्यच असावा, अन्यथा गाठ आमच्याशी : मराठा क्रांती माेर्चा

रविवारी संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद देऊन ऐतिहासिक चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखविला गेल्याचा आक्षेप नाेंदविला हाेता.
maratha kranti morcha, sambhajiraje chhatrapati, vedat marathe veer daudale saat movie, chhatrapati shivaji maharaj
maratha kranti morcha, sambhajiraje chhatrapati, vedat marathe veer daudale saat movie, chhatrapati shivaji maharajsaam tv
Published On

Maratha Kranti Morcha News : 'वेडात मराठे वीर दौडले सात' (vedat marathe veer daudale saat) या महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवला गेल्याचा आक्षेप संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला आहे. राजेंच्या घेतलेल्या भूमिकेला मराठा क्रांती मोर्चाने पाठिंबा दिला आहे. मांजरेकर यांनी चित्रपटात दुरूस्ती करावी अन्यथा चित्रपट सिनेमागृहात चालू देणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर यांनी दिला आहे. साखळकर हे पंढरपूरात बाेलत हाेते. (sambhajiraje chhatrapati latest marathi news)

'हर हर महादेव' हा चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आमदार अमोल मिटकरीनंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन दाेन चित्रपटांवर आक्षेप नाेंदविला. ऐतिहासिक चित्रपटातून इतिहासाचा विपर्यास होत असल्याचे मत संभाजीराजेंनी व्यक्त केले. संभाजीराजे यांनी ऐतिहासिक चित्रपटांमध्ये इतिहास चुकीचा दाखवला जात असल्याचे म्हटले आहे. महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटावरही राजेंनी आक्षेप घेतला आहे. या दाेन्ही चित्रपटांमध्ये इतिहासाची अवहेलना केल्याचे म्हटले आहे. संभाजीराजे यांनी चित्रपटातील अभिनेते हे चित्रपटातील व्यक्तिरेखेला शोभत नसल्याचेही म्हटले आहे. (Maharashtra News)

maratha kranti morcha, sambhajiraje chhatrapati, vedat marathe veer daudale saat movie, chhatrapati shivaji maharaj
Satara News : किस्साच झाला ! शिवेंद्रराजे पाेहचताच उदयनराजेंचा फोन कट, मंत्री देसाई लागले हसू

संभाजीराजे यांच्या भूमिकेला मराठा क्रांती मोर्चाने (maratha kranti morcha) पाठिंबा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखविला जाऊ नये. चित्रपटात (movie) दुरूस्ती करा अन्यथा चित्रपट सिनेमागृहात चालू देणार नाही असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर यांनी दिला आहे. संभाजीराजेंच्या आक्षेपा नंतर विविध मराठा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

maratha kranti morcha, sambhajiraje chhatrapati, vedat marathe veer daudale saat movie, chhatrapati shivaji maharaj
Maharashtra News : कव्वाली कार्यक्रमात गाेळीबार ? व्हिडिओ व्हायरल, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com