maratha kranti morcha andolan for kunbi certificate saam tv
महाराष्ट्र

Maratha Kranti Morcha : ...अन्यथा माळशिरस तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयाचे कामकाज बंद पाडणार : मराठा क्रांती माेर्चा

भारत नागणे

Pandharpur News :

कुणबी नोंदी‌ तपासून जातीचे दाखले मिळावेत या मागणीसाठी माळशिरस येथील तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान प्रशासनाने दिरंगाई केल्यास मराठा समाज तीव्र आंदाेलन छेडेल असा इशारा देखील मराठा क्रांती माेर्चाने प्रशासनास दिला. (Maharashtra News)

दोन महिने झाले तरी माळशिरस तालुक्यात अद्याप कुणबी नोंदी तपासणीचे काम सुरू झाले नाही. मोडी लिपी तज्ञ नसल्याने नोंदी तपासणीचे काम राखडले आहे. नोंदी तपासून कुणबी दाखले द्यावेत या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

या आंदाेलनात असंख्य मराठा समाज बांधवांनी सहभाग नाेंदविला. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी दोन दिवसात मोडी लिपी तज्ञ नियुक्त करून कुणबी दाखले द्यावेत अन्यथा माळशिरस तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयाचे कामकाज बंद पाडू असा इशारा प्रशासनास दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

VIDEO : विधानसभेच्या तोंडावर थोरातांना मोठा धक्का !

SCROLL FOR NEXT