Kapil Sharma: रिंग ऐकली नाहीतर पुढचा हल्ला मुंबईत; कॅफेवरील गोळीबारनंतर कपिल शर्माला धमकी

Kapil Sharma Cafe Firing Again: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार झालाय. गोल्डी ढिल्लो आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. यासह त्यांनी कपिल शर्माला मोठी धमकीही दिलीय.
Kapil Sharma Cafe Firing Again
Kapil Sharma’s café in Surrey, Canada, attacked again; gang releases video claiming responsibility saamtv
Published On
Summary
  • कपिल शर्मा यांच्या कॅनडामधील कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार.

  • गोल्डी ढिल्लो आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी.

  • सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओद्वारे कपिल शर्माला धमकी.

  • "रिंग नाही ऐकली, तर पुढचा हल्ला मुंबईत" असा स्पष्ट इशारा.

कॅनडामधील सरे येथील कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माच्या 'कॅप्स कॅफे'वर पुन्हा एकदा गोळीबार झालाय. या गोळीबाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गोळीबारीची जबाबदारी गोल्डी ढिल्लो आणि लॉरेन्स बिश्नोई गँगनं घेतलीय. तसेच या गोळीबारीचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलाय. सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यांनी कपिल शर्माला धमकीही दिलीय. रिंग नाही ऐकली तर पुढचा हल्ला हा मुंबईत होईल, अशी धमकी त्यांनी दिलीय. (Goldy Dhillon-Lawrence Bishnoi Gang Claims Responsibility for Kapil Sharma Café Attack)

गोळीबारानंतर गोल्डी ढिल्लो नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट व्हायरल होत आहे. "जय श्री राम. सतश्री अकाल. सर्व बांधवांना राम राम. आज कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेमध्ये गोळीबार झाला. याची जबाबदारी गोल्डी ढिल्लो आणि लॉरेन्स बिश्नोई टोळी घेत आहे अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलीय.

Kapil Sharma Cafe Firing Again
Kapil Sharma: कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारानंतर कपिल शर्माने व्यक्त केलं दु:ख; म्हणाला, 'आम्हाला धक्का बसला आहे पण...'

पुढे, पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आम्ही त्याला फोन केला पण त्याला रिंग ऐकू आली नाही, म्हणून आम्हाला कारवाई करावी लागली. जर त्याने तरीही रिंग ऐकली नाही तर आम्ही लवकरच मुंबईत पुढचा हल्ला करू.” मुंबई पोलिस कपिल शर्माला धमकी देणाऱ्या या सोशल मीडिया पोस्टची पडताळणी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com