maratha community calls beed and latur bandh tommorow  Saamtv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil यांना पाठिंबा; उद्या लातूर, बीडमध्ये बंद

Siddharth Latkar

- विनाेद जिरे / संदीप भाेसले

Manoj Jarange Patil News :

मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपाेषणास पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने उद्या (बुधवार) लातूर (latur) आणि बीड (beed) येथे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. साम टीव्हीशी बाेलताना दाेन्ही जिल्ह्यातील मराठा समाजाच्या समन्यवकांनी मनाेज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकराने मान्य कराव्यात अशी मागणी केली आहे. (Maharashtra News)

लातूरला बैठक संपन्न

गेल्या 4 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे सगे-सोयरे या अध्यादेशासाठी बेमुदत उपोषणास बसले आहेत. दरम्यान त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या लातूरमध्ये मराठा समाजाच्या वतीने लातूर बंदच आवाहन करण्यात आले आहे. आज मराठा समाजाच्या वतीने बैठक घेत एक दिवसीय लातूर बंदचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती कुलदीप सूर्यवंशी यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

सरकारने तात्काळ आरक्षणासंदर्भात निर्णय घेऊन मराठा आंदोलनावर तोडगा काढावा. मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताला काही झालं तर खूप मोठा उद्रेक होईल असा इशारा बीड येथील गंगाधर काळकुटे (मराठा क्रांती मोर्चा समन्वयक) यांनी दिला आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्या बीड बंद

दरम्यान उद्या बीड जिल्ह्यातील व्यापारी बांधवांनी बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा समन्वयक काळकुटे यांनी साम टीव्हीशी बाेलताना केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

Kalyan Crime : डिलिव्हरी बॉय, पण काम भयंकर, व्हिडिओ बघून सर्वच हैराण; CCTV पाहा

Jalgaon Religious Places : निसर्गाचं सानिध्य अन् भक्तीचा मेळ, जळगावातल्या धार्मिक स्थळांना भेट द्याच!

Bacchu Kadu: 'राज्याचा सातबारा नावावर आहे का?' बच्चू कडूंचा संजय राऊत, रोहित पवारांवर प्रतिहल्ला; २८८ जागा लढवण्याचीही घोषणा!

SCROLL FOR NEXT