Maratha Reservation Manoj Jarange patil Saam
महाराष्ट्र

'....अन्यथा पुन्हा आंदोलनाचा पवित्रा' मनोज जरांगे पाटलांनी सांगितली पुढील भूमिका; सरकारलाही दिला इशारा

Maratha Reservation Manoj Jarange patil: मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि आंदोलन यशस्वी; सरकारनं काढला जीआर. मराठा बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण; मात्र ओबीसी वर्ग आक्रमक.

Bhagyashree Kamble

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांच्या पाच दिवसांच्या उपोषण आणि आंदोलनाला अखेर यश आलं. मराठा आरक्षण ओबीसी प्रवर्गातून मिळावे, यासाठी त्यांनी ‘चलो मुंबई’ आंदोलन छेडलं होतं. सरकारनं जीआर काढल्यानंतर मराठा बांधवांत आनंदाचं वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे ओबीसी वर्ग आक्रमक झाल्याचंही दिसून आलं आहे. सध्या जरांगे पाटील रूग्णालयात उपचार घेत आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुढील भूमिका स्पष्ट केली.

पत्रकारांनी यावेळी मनोज जरांगे पाटलांना पुढील भूमिकेबाबत विचारलं. जरांगे पाटील म्हणाले, 'आता मराठवाडा आणि पश्चिम दौरा होणार नाही. आता आम्ही बांधव खुश झालो आहोत. आम्ही जवळपास लढाई जिंकली. आम्ही आरक्षण मिळवलंय. जीआर निघाला म्हणजे लहान गोष्ट निघाली नाही', असं जरांगे पाटील म्हणाले.

यावेळी जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना आवाहन केलं, 'मी महाराष्ट्रातील गरीब मराठा लोकांना सांगतो की, मला भेटण्यासाठी कुणीही हार, पुष्पगुष्य, शाल असे वस्तू आणू नये. हार किंवा शालीवर खर्च करू नका. त्याजागी आपल्या पैशांच्या वापर गरिबांसाठी करा. गरिबांची मदत करा. भेटल्यानंतर मला घरातील कुंकू लावले तरी चालेल', असं जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटलांनी यावेळी सरकारचं कौतुक तसंच इशाराही दिला. 'कुणी बॅनर लावा, कुणी कॅम्पियन करा, आम्ही तुमचे आभार आणि कौतुक करू मात्र तातडीने प्रमाणपत्र द्या', असं जरांगे पाटील म्हणाले. 'तुम्ही कामे केल्यास आम्ही तुम्हाला मोठेपणा देऊ. शिंदे समितीस बढती दिल्यास सर्व विभागात नोंदी शोधण्याचे काम सुरूच ठेवा. सरकारनं वेळेत काम केल्यास आम्ही त्यांचं कौतुकच करू. आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा पुन्हा आंदोलनाचा पवित्रा हाती घेऊ', असंही जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे हादरले! पत्नीची निर्घृण हत्या करून पतीनेही संपवले आयुष्य; कारण वाचून पायाखालील जमीन सरकेल

Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; आता व्हीआयपी दर्शन बंद, काय आहे नेमका नियम?

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

SCROLL FOR NEXT