Bacchu Kadu On Chhagan Bhujbal Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ...अन्यथा राजीनामा द्या, बच्चू कडू यांचं थेट भुजबळांना आव्हान

Bacchu Kadu News : आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापलेल्या शिंदे समितीचं काम आता संपलंय. त्यामुळे या समितीचा अहवाल आम्ही मान्य करणार नाही, अशी आक्रमक भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.

साम टिव्ही ब्युरो

>> मयूर सावंत

Bacchu Kadu On Chhagan Bhujbal :

आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापलेल्या शिंदे समितीचं काम आता संपलंय. त्यामुळे या समितीचा अहवाल आम्ही मान्य करणार नाही, अशी आक्रमक भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली. भुजबळांच्या या वक्तव्याला प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. शिंदे समिती रद्द करा अन्यथा राजीनामा द्या, असं म्हणत बच्चू कडू यांनी छगन भुजबळ यांना खुलं आव्हान दिलंय.

मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील हे दोन्ही नेते आमने-सामने आले आहेत. दोन्ही नेत्यांकडून एकमेंकावर जोरदार टीका केली जात आहे. छगन भुजबळ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोधच असेल, असं छगन भुजबळ म्हणाले. भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. भुजबळांच्या या भूमिकेवर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही टीका केली होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिंगोलीत पार पडलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी प्रक्षोभक विधान केलं होतं. तायवाडे यांनी हातपाय कापून ठेवण्याची भाषा केली होती. ते म्हणाले होते की, ''आम्ही ओबीसी शांतपणे जगणारे लोक आहोत.'' उपस्थित लोकांना संबोधित करून ते म्हणाले, ''ओबीसींचा अपमान कोणी केला तर त्याची हातपाय कापून ठेवण्याची ताकद ठेवा. (Latest Marathi News)

यावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत तायवाडे यांना इशारा दिलाय. ते म्हणाले आहे की, ''हातपाय कापणं सोप्प आहे, त्याला ताकद लागत नाही. हातपाय जोडण्याचं काम केलं पाहिजे. भुजबळ यांनी इतके वर्ष राज्य केलं. त्यांनी कापण्यापेक्षा लोकांना जोडता कसं येईल, हे पाहायला हवं.''

बच्चू कडू म्हणाले, ''ओबीसी नेते तायवाडे यांना आमचा इशारा आहे की, ''तुम्ही हातपाय कापा, आम्ही जोडण्याचं काम करू. तुमची बुद्धी इतकी खाली गेली असेल, तर त्याचा आम्ही निषेध करतो. तुम्ही आरक्षण मागावं, पण शांततेने.'' बच्चू कडू यांनी भुजबळ आणि बबनराव तायवाडे यांना दिलेल्या आव्हानांनतर हे दोन्ही नेते काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणंच महत्त्वाचं ठरेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, कोल्हापूरातील 'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

Tringalwadi Killa : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचंय? त्रिंगलवाडी किल्ला ठरेल बेस्ट

Karishma Kapoor: ५१ वर्षांच्या करिश्माचा काय आहे स्किन केअर सिक्रेट; जाणून घ्या

Maharashtra Politics : शिंदे गटाला भाजपकडून धक्का! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कोणाचा हात? शिवराज बांगर यांनी केला धक्कादायक आरोप

SCROLL FOR NEXT