Gujarat Heavy Rainfall: गुजरातमध्ये पावसाचा कहर, 24 जणांचा मृत्यू, 23 जखमी; जाणून घ्या हवामानाची अपडेट

IMD Rain News : गुजरातमध्ये पावसाचा कहर, 24 जणांचा मृत्यू, 23 जखमी; जाणून घ्या हवामानाची अपडेट
Gujarat Heavy Rainfall:
Gujarat Heavy Rainfall: Saam TV
Published On

Gujarat Heavy Rainfall:

गुजरातमध्ये आज सकाळपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विसकळीत झालं आहे. गेल्या 24 तासात वीज पडून एकूण 24 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 23 जण जखमी झाले आहेत. परिस्थिती पाहता राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे.

गुजरातमधील दाहोद जिल्ह्यात या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. बनासकांठा आणि भरूच जिल्ह्यात प्रत्येकी 3, तापी जिल्ह्यात 2, तर अहमदाबाद, अमरेली, आनंद, खेडा, द्वारका, पंचमहाल, पाटण, बोताड, मेहसाणा, साबरकांठा, सुरत आणि सुरेंद्रनगर जिल्ह्यात प्रत्येकी 1 मृत्यू झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gujarat Heavy Rainfall:
Telangana Assembly Election : 'ते स्वत: श्रीमंत झाले, तेलंगणातील गरीब आणखी गरीब झाले', प्रियांका गांधींचा BRS वर हल्लाबोल

पाऊस आणि सोसाट्याचा वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान

सततच्या मुसळधार पावसासोबतच वीज पडून 71 गुरांचा मृत्यू झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे सुरत, जुनागढ आणि नर्मदा येथे कच्च्या घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. 29 ठिकाणी झोपड्या आणि कच्ची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. याशिवाय शेतातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  (Latest Marathi News)

सरकार देणार आर्थिक मदत

रविवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही शोक व्यक्त केला. या संपूर्ण घटनेबाबत राज्य सरकारचे प्रवक्ते मंत्री हृषिकेश पटेल म्हणाले की, अवकाळी पावसामुळे लोकांना आणि शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे जपान दौऱ्यात व्यस्त असतानाही त्यांनी कृषीमंत्र्यांशी फोनवर बोलून माहिती दिली आहे. मृत्युमुखी पडलेल्यांना शासकीय नियमानुसार भरपाई दिली जाईल.

Gujarat Heavy Rainfall:
Pune Crime News : ऐन दिवाळीत चोरट्याने साधला डाव, 12 लाखांचे दागिने केले चोरी; पोलिसांनी 100 CCTV तपासून ठोकल्या बेड्या

हवामान खात्याने दिला हलक्या पावसाचा इशारा

अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या दबावामुळे हा अवकाळी पाऊस झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. पुढील 24 तासांत उत्तर गुजरात, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. IMD नुसार, गुजरातच्या अहमदाबादमध्ये मंगळवारी वातावरण ढगाळ असेल. पुढील एक आठवडा इथे पाऊस पडण्याची शक्यता नाही. मंगळवारीअहमदाबादमध्ये किमान तापमान 16 अंश, कमाल 29 अंशांवर जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com