Jarange Patil On PM Modi Saam TV
महाराष्ट्र

Jarange Patil On PM Modi: त्यांना गरीब, गरजूंच्या वेदना ऐकू येत नाहीत...; मराठा आरक्षणप्रश्नी जरांगे पाटलांना मोदींच्या भूमिकेवर शंका

Maratha Aarakshan: पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे.

Ruchika Jadhav

Jarange Patil:

महिनाभराची मुदत संपूनही मराठा आरक्षणाचा तिढा सरकारकडून अद्याप सुटलेला नाहीये. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आरक्षणासाठी दुसऱ्यांदा जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा हा पहिलाच दिवस आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माध्यमांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले की, "मोदींना आम्ही फक्त आवाहन केलं होतं. आमचं आरक्षण आम्हाला द्या. त्यांनी जर राज्याला सांगितलं तर आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत आरक्षण इथे येईल. त्यामुळे आम्ही त्यांना हाक मारली होती. पण त्यांना ती ऐकू आली नाही असं वाटतंय. ते गोरगरिबांचं ऐकतात असं ऐकलं होतं, पण तसं दिसत नाहीये. त्यांना दुसऱ्यांच्या विनंत्या ऐकायच्या असतील. त्यामुळे गोरगरिबाचं त्यांनी नाही ऐकलं. मोदी साथ देतील असं वाटलं होतं. मात्र मोदींना गरिबांच्या लेकरांच्या वेदना ऐकू येत नाहीत वाटतंय, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे.

"आम्ही सगळ्या पक्षांचा मानपान ठेऊन त्यांना एका महिन्याचा वेळ देऊन सन्मान केला होता. कालपर्यंत आम्हाला अपेक्षा आणि आशा असताना सुद्धा सरकारने ती पूर्ण केली नाही. सरकारने जे गुन्हे दाखल केले होते, ते आज ४१ व्या दिवशीही मागे घेण्यात आले नाही.", असं जरांगे पाटील म्हणाले.

सभेदरम्यान काही मराठा तरुण अपघातात जखमी झाले, त्यांच्यासाठी देखील कुठलीच भूमिका सरकारने घेतली नाही. आत्ताच गिरीश महाजन यांचा फोन आला. या मागण्या मार्गी लावू असं त्यांनी म्हटलं. मात्र अद्याप त्यांनी निर्णय घेतला नाही, अशी खंत जरांगेंनी व्यक्त केलीये.

सरकार फक्त भावनिक आश्वासन देतंय आणि पुरावे नाहीत असं म्हणताहेत. आमच्या लोकांना बीड जिल्ह्यात ६४ गावांत पुरावे सापडलेत. तरीही सरकार म्हणतंय पुरावे नाहीत. आता मी थांबणार नाही. मुख्यमंत्र्यांनी काल शपथ घेतली. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. पण आम्ही त्यांच्या म्हणण्यावर ४० दिवस दिले आज ४१ दिवस झाले तरी आरक्षण का नाही?, असा सवाल जरांगेंनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Fire News: आधारवाडीतील इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

SCROLL FOR NEXT