Maratha Reservation : मराठा आरक्षणाची सरकारची डेडलाईन हुकली, आंदोलक आक्रमक; पुण्यातील चाकण परिसरात महामार्गावर बस रोखल्या

Pune News : कामगारांना कामावर न जाण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केले.
Pune News
Pune News
Published On

Pune News :

मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी सरकारला दिलेली २४ ऑक्टोबरची डेडलाईन हुकली आहे. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारला पेलवणार नाही, असं आंदोलन करु असा इशारा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. त्याचे पडसाद आज सकाळी पुण्यात पाहायला मिळाले. (Latest News)

चाकण औद्योगिक क्षेत्रात कामावर निघालेल्या कामगारांच्या बस मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवल्या आहेत. कामगारांना कामावर न जाण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केले. कामगारांच्या बस पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली टोलनाक्यावर रोखल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune News
Dussehra Melava : दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेला रुईकर आहे तरी कोण? ठाकरेंसाठी काय केलं होतं?

मराठा क्रांती मोर्चाकडून आज चाकण औद्योगिक क्षेत्र एक दिवस बंदची हाक देण्यात आली होती. तरीही कंपन्या बंद न ठेवता कामगार कंपनीकडे जात असताना मराठा बांधवांनी पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली टोलनाक्यावर कामगारांची वाहतूक करणाऱ्या बस रोखून धरल्या.

Pune News
Pune Accident: सिंहगड रस्त्यावर भरधाव कारने ३ महिला आणि लहान मुलाला उडवले, भयंकर अपघाताचा VIDEO

यावेळी कामगारांना मराठा आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान चांडोली येथे बस रोखल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होण्याच्या तयारीत असून केंद्र आणि राज्य सरकारने सकारात्मक विचार करावा असे आवाहन देखील करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com