Pune Accident: सिंहगड रस्त्यावर भरधाव कारने ३ महिला आणि लहान मुलाला उडवले, भयंकर अपघाताचा VIDEO

Pune Accident News: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील हिंगणे चौकात अपघात झाल्याची घटना घडली आहे.
pune news
pune news Saam tv
Published On

सचिन जाधव

Pune Accident News:

पुण्यातून अपघाताचं वृत्त हाती आलं आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील हिंगणे चौकात अपघात झाल्याची घटना घडली आहे. तीन महिला आणि एका लहान मुलाला चार चाकीने उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

पुण्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढू लागल्या आहेत. आज मंगळवारी देखील अपघाताची घटना घडली आहे. पुण्यातील हिंगणे चौकात ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात भरधाव कारने ३ महिला आणि लहान मुलाला उडवल्याची घटना घडली. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या अपघातातील जखमींवर रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

pune news
Shiv Sena Dasara Melava: दसरा मेळावा एकच असतो अन् तो मर्दांचा असतो: अंबादास दानवे यांचा शिंदे गटावर घणाघात

नेमका अपघात कसा झाला?

पुण्यातील विठ्ठलवाडीहून आनंद नगरकडे जाताना हिंगणे बस स्थानकाच्या जवळ एका चारचाकीच्या चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर चालकाचा चारचाकीवरील ताबा सुटल्याने या कारने बस स्थानकाजवळ उभ्या असलेल्या तीन महिलांना उडवलं.

pune news
Uddhav Thackeray Dasara Melava 2023: खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे; उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यातून शिंदे गटावर बाण

तीन महिलांना उडवल्यानंतर भरधाव कार ही पुढे जाऊन थांबली. या अपघातात या रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन महिलांसह एक लहान मुलगा आणि एक पुरुष जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. या अपघात प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. भीषण अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com