wai satara morcha, maratha andolan saam tv
महाराष्ट्र

Wai Satara Maratha Morcha : सकल मराठा समाज वाई - सातारा पायी माेर्चा, आंदाेलकांना पाचवडनजीक पाेलिसांनी राेखले; प्रशासन-समन्वयकांची चर्चा सुरु

Maratha Andolan : या माेर्चात गावागावातील तरुण माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

ओंकार कदम

Wai Satara Maratha Morcha : मराठा समाजाच्या वतीने आज (मंगळवार) वाई शहर बंदचे आवाहन करण्यात आले हाेते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान वाई सातारा असा सकल मराठा समाजाने काढलेला पायी माेर्चा हा पाेलिस दलाने पाचवड येथे थांबविला. आंदाेलकांना साता-याकडे जाऊ नये असे आवाहन पाेलिसांनी केले. (Maharashtra News)

जालना येथील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर याचे पडसाद राज्यभरात उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज वाईहून साताऱ्याच्या दिशेने पायी चालत भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

या माेर्चाची सुरुवात आज सकाळी वाईतील ढाेल्या गणपती येथून झाली आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत. जालना येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरणाची सखोल चौकशी आणि मराठा आरक्षणाबाबत मराठ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करीत मोर्चा साता-याकडे मार्गक्रमण करत राहिला.

हा माेर्चा पाचवड फाट्यावर येताच पाेलिसांना आंदाेलकांना साता-याच्या दिशेने जाऊ नये असे आवाहन केले. यावेळी आंदाेलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास निघाल्याचे पाेलिस दलास सांगितले.

यावेळी पाचवड येथे अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी मराठा समाजाच्या समन्वयकांशी चर्चा करुन साता-याकडे जाऊ नये आम्ही आपले निवदेन प्रशासनाकडे देऊ असे आश्वासन दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोलीत मुसळधार पाऊस, इसापूरमध्ये गावकरी अडकले

बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

Karishma Kapoor Children: संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे; करिश्मा कपूरच्या मुलांची हायकोर्टात धाव, नेमका वाद काय?

Maharashtra Tourism: नैसेर्गिक सौंदर्य अन् मनमोहक दृश्ये; मालेगावपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर ठिकाण, एकदा भेट द्याच

Bharli Vangi Recipe : गावरान भरली वांगी, रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी

SCROLL FOR NEXT