Maratha Arakshan Andolan : काेल्हापूरातील एसटीची सेवा स्थगित, प्रवाशांना खासगी बसचा आधार, साता-याच्या युवतीने सांगितली आपबिती

गडहिंग्लज येथे काँग्रेस आमदार सतेज पाटील हेही मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी झाले.
kolhapur, maratha reservation, msrtc bus,
kolhapur, maratha reservation, msrtc bus, saam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : सकल मराठा समाजाने आज सातारा जिल्हा बंदची हाक दिली हाेती. या बंदला (satara band latest marathi news) जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर काेल्हापूर येथे राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या साता-याला जाणा-या फे-या अचानक रद्द केल्या. यामुळे प्रवाशांना खासगी बसचा आधार घ्यावा लागला. (Maharashtra News)

kolhapur, maratha reservation, msrtc bus,
Maratha Aarakshan Andolan Live News : ...तर पहिली गाेळी माझ्यावर झाडा..., मराठा आंदाेलकांच्या भेटीनंतर संभाजीराजे भडकले (पाहा व्हिडिओ)

सातारा येथे मराठा समाजाचे आंदोलन असल्याने काेल्हापूरात एसटीच्या सर्व फेऱ्या तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. हे आंदोलन संपल्यानंतर एसटीच्या फेऱ्या सुरू होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अचानक एसटीने बस तसेच शिवशाही आणि शिवाई बस बंद केल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसला.

kolhapur, maratha reservation, msrtc bus,
Teachers Day दिवशी महाराष्ट्रातील लाखाे शिक्षक जाणार सामूहिक रजेवर; जाणून घ्या नाराजीचे कारण

साता-याला खासगी बसमधून निघालेल्या एका युवतीने साम टीव्हीशी बाेलताना तिला आलेला अनुभव सांगितला. ती म्हणाली एसटीने अचानक बस बंद ठेवणार असल्याचे घाेषित केले. त्यामुळे मला स्टॅंडवरुन बाहेर पडावे लागले. येथे खासगी बस मिळाली. आता मी साता-याला जात आहे परंतु ही बस मला राष्ट्रीय महामार्गावर साेडणार. एसटी सारखी बसस्थानकात येणार नाही. त्यामुळे माझ्या पालकांना महामार्गावर मला न्यायला आणण्यासाठी बाेलावे लागणार आहे. कारण साता-यात देखील बस बंद आहेत.

kolhapur, maratha reservation, msrtc bus,
Nitesh Rane News : सिंधुदुर्गच्या इतिहासात कधी नव्हे ते अशी निंदनीय घटना घडली : नितेश राणे

निपाणीत निषेध

मराठा आरक्षणासाठी जालना (maratha jalna) इथं सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी केलेला लाठीमार याचे पडसाद संपूर्ण राज्यासह सीमा भागातही उमटलेले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी परिसरातही या घटनेचा निषेध म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde on maratha reservation), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis news), उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar latest news) यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी तिरडी आंदोलन करत या संपूर्ण घटनेचा आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com