Beed, MSRTC Bus, Maratha Reservation saam tv
महाराष्ट्र

Beed Bus Service Resumes : प्रवाशांना दिलासा, बीड जिल्हा अंतर्गत एसटीची सेवा पूर्वपदावर

Maratha Arakshan Andolan : बीड विभागाच्या 5 बसेस जाळल्या गेल्या. त्यापैकी 3 शहागड परिसरात आणि 2 बीड जिल्ह्यात जाळण्यात आल्या हाेत्या.

विनोद जिरे

Beed News : बीड जिल्हा अंतर्गत एसटी बस पूर्वपदावर आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बीड जिल्ह्यात 90 बसेस रस्त्यावर धावत (Beed MSRTC Bus Service resumes from today) आहेत. गेले दाेन दिवस बस बंद राहिल्याने बीड जिल्हा राज्य परिवहन महामंडळाचे 1 कोटी 30 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra News)

जालना येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलकांनी एसटी बस टार्गेट केली. त्यामुळं बीड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सर्वसामान्यांची लालपरी बंद होती.

दरम्यान सर्वसामान्यांची लालपरी जिल्हा अंतर्गत स्वरूपात सुरू झाली आहे. रात्री उशिरापासून ही लालपरी सुरू झाली आहे. आज जिल्ह्यातील रस्त्यांवर तब्बल 90 लालपरी धावत आहेत. दरम्यान गेली 2 दिवस एसटी बस बंद राहिल्याने, बीड विभागाचे तब्बल 1 कोटी 30 लाखाचं नुकसान झाले आहे अशी माहिती अजय मोरे (विभाग नियंत्रक, बीड) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

आतापर्यंत बीड विभागाच्या 5 बसेस जाळल्या आहेत. त्यापैकी 3 शहागड परिसरात आणि 2 बीड जिल्ह्यात जाळण्यात आल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: विराट कोहलीचा मोठा खुलासा; 2027 चा वर्ल्डकप भारतासाठी शेवटचा, रोहितनेही सांगितला प्लान

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Asian Games 2026 : भारतीय महिला कबड्डी संघानं इतिहास रचला; एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर कोरलं नाव, ईराणला नमवलं

Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

Hair Care: हेअर फॉल होईल कमी, फक्त ३ आठवडे कांद्याचा रस लावून पाहा, केस होतील मजबूत आणि घनदाट

SCROLL FOR NEXT