Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप; जंगी सभेमुळे वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Rohini Gudaghe

अभिजीत देशमुख, साम टीव्ही नाशिक

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासंदर्भात मोठी बातमी आहे. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होणार आहे. या रॅलीला लाखो मराठा समाज बांधव उपस्थित राहतील असा अंदाज वर्तविण्यात आलाय. रॅलीमुळे निम्म्या शहरातील रस्ते बंद आज करण्यात आले आहेत. शहरातील सर्व शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केलीय.

मनोज जरांगे यांची नाशिकमध्ये रॅली

मनोज जरांगे यांच्या रॅलीमुळे सिटीलिंक बसच्या अकराशे फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तपोवन ते सीबीएस असं सात किलोमीटरपर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. रॅलीनंतर सीबीएस चौकात चारही बाजूने खुल्या व्यासपीठावर जरांगे (Manoj Jarange Patil) यांची सभा पार पडणार आहे. मराठा आरक्षण शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये शेवटचा दिवस आहे.

वाहतूक मार्गात मोठे बदल

नाशिक शहरातील वाहतूक मार्गात आज कोणते बदल करण्यात आले आहेत, ते पाहू या. मराठा आरक्षण शांतता रॅलीमुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत. वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक मार्गात बदल केले गेले (Maratha reservation shantata rally) आहेत. आज सकाळी आठ वाजेपासून ते रॅली संपेपर्यंत पर्याय मार्गाचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक शाखेकडून नागरिकांना करण्यात आलंय. रॅली वेळी शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत.

शाळांना सुट्टी

नाशिक शहरातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय. मनोज जरांगे यांच्या शांतता रॅली आणि सभेच्या (Maratha reservation) पार्श्वभूमीवर शहरातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात (Nashik News) आलीय. मनोज जरांगे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे. मनोज जरांगे यांच्या रॅली आणि सभेला मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी निर्णय घेण्यात आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला स्वत:च्या रक्षणासाठी 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

SCROLL FOR NEXT