MANOJ JARANGE TARGETS DEVENDRA FADNAVIS OVER KUNBI CERTIFICATE CANCELLATION ROW Saam Tv
महाराष्ट्र

Manoj jarange : मी चिडलो तर कुणालाच सोडणार नाही, कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याने जरांगे सरकारवर संतापले

Manoj jarange On Kunbi Cast : कुणबी जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. अधिकाऱ्यांवर दबाव टाकून प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याचा दावा करत त्यांनी सरकारला इशाराही दिला.

Alisha Khedekar

  • कुणबी जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील संतापले

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप

  • अधिकाऱ्यांवर दबाव टाकून प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याचा दावा

राज्यात रद्द करण्यात आलेल्या कुणबी जात प्रमांप्रमाणपत्रांच्या मुद्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे मुख्य नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकार राजकारणासाठी मराठ्यांचा छळ केला जात असून अधिकाऱ्यांवर थेट दबाव आणून कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याचा अत्यंत गंभीर आरोप त्यांनी आंतरवली येथे माध्यमांशी बोलताना केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांच्या नादी न लागण्याचा इशारा दिला आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी म्हटले की, सरकारने राज्यात गैरसमज पोहोचवला आहे. तुमचं आणि माझं चांगलं सुरु होत पण तुम्ही मराठे अंगावर घेतले आहेत. बावनकुळे यांनी फडणवीसांना कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पत्र दिल आहे. ते पत्र असल्याचा दावा जरांगे यांनी केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत जरांगेनी म्हटले की, देवेंद्र साहेब बोकांडी बसायचं बंद करा. एका आडनावाचे ३००० लोक आहेत राजकीय द्वेषापोटी त्या सगळ्या लोकांना फाशीवर देणार का? फोन करून तुम्ही कुणबी प्रमाणपत्र रद्द करायला सांगितले. राजकारणासाठी तुम्ही नालायकपणा करायला लागले आहेत. असा आरोप जरांगेनी केला.

पुढे ते म्हणाले, बावनकुळेंना मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचे जर पॉवर दिली तर, तुमच्या एकट्या बावनकुळे सारख्या २५ ते ३० जणांना एकटा पुरून उरेन मी. सरकारने मराठे संपवण्याचा कट रचला आहे. फडणवीस तुम्ही आमच्या नादाला लागू नका. तुम्हाला मराठे पाहिजेत की बावनकुळे हे तुम्ही ठरवा. माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं करू नका. हा डाव फडणवीस सरकारचा आहे. माझ्या अंगावर येणं महागात पडेल असा इशारा जरांगे यांनी फडणवीसांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

Saturday Horoscope : ६ राशींची होणार चांदी; कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Saree Colour Tips: साडीत दिसाल एकदम स्लिम अन् गॉर्जियस! बॉलिवूड अभिनेत्री फॉलो करतात हा सिक्रेट कलर फॉर्म्युला

8th Pay Commission : 3.83 किंवा 4.0 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास किती वाढेल पगार? जाणून घ्या गणित

BJP Leader: भाजप नेत्याच्या ताफ्यावर हल्ला, दगड-अंडी फेकल्याचा आरोप; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT