Manoj Jarange Warn Minister Chhagan Bhujbal Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange VIDEO : छगन भुजबळ यांना दंगल घडवून आणायचीय, जशाच तसे उत्तर देऊ; मनोज जरांगे संतापले

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ वारंवार चिथावणी देत त्यांना दंगल घडवून आणायची आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

Satish Daud, डॉ. माधव सावरगावे

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक गंभीर आरोप केला आहे. आमच्या आंदोलनासमोर ओबीसी आंदोलन उभे करून काहींचा दंगल घडवण्याचा डाव आहे. त्यासाठी लोक अंगावर घातली जात आहेत. छगन भुजबळ वारंवार चिथावणी देत त्यांना दंगल घडवून आणायची आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. मराठा समाज ५६ टक्के असून आता सावध झालं पाहिजे. भुजबळ तलवार काढण्याची धमकी देत असेल, तर जशास तसे उत्तर देऊ, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. मंत्री छगन भुजबळ यांनी तलवारी गंजल्या त्या घासून ठेवा असं विधान केलं. त्यांना दंगल घडवायची आहे का? असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला.

मराठांनी तयार राहावे, यांनी दंगल घडवली तर माझा एकही माणूस मरता काम नये, असं विधान देखील जरांगे यांनी केलं आहे. पुढे बोलताना जरांगे म्हणाले, "मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मी नेमकं महत्त्वाच्या विषयावर बोट ठेवल्याने सगळ्यांना पोटदुखी होऊ लागले. आम्ही केलेली मागणी सत्य असून ती अनेकांना रुचलेली दिसत नाहीये. मी आता एकटा पडलोय"

"मराठ्यांचे नेते मतांचा विचार करतात आरक्षणाचा नाहीत. पण भाजपामधील सर्व ओबीसी नेते तसेच आमदार एकत्र झाले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचे नाही हे त्यांनी ठरवलं आहे. हे मराठ्यांच्या नेत्यांना समजत नाही का? ओबीसी नेते पदाला आणि मताला किंमत द्यायला तयार नाहीत. याचा अर्थ तुम्हाला कळतंय का आरक्षण किती महत्त्वाचं आहे", असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

"मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडला आहेत. सर्व नोंदी सरकारी असून त्यात मराठा हा कुणबी असल्याचा उल्लेख आहे. मी नेमकं महत्त्वाच्या विषयावर बोट ठेवल्याने सगळ्यांना पोटदुखी होऊ लागली आहे. पण हा मुलगा जो पर्यंत या लढ्यात आहे तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळून देणार आहे. मराठ्यांच्या जीवावर निवडून येणारे ओबीसी नेते आता मराठा समाजासमोर उघडे पडले आहेत", असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

"मराठा समाजातील बांधवांनी ६ जुलैपर्यंत आपली शेतीतील सर्व कामे आटोपून घ्यावीत. आपल्याला शांततेत रॅली काढायची आहे. ६ जुलै ते १३ जुलैपर्यंत जे मराठा आरक्षण रॅली ठेवली आहे. सगळ्यांनी ताकदीने लढायचं आहे. मी एकटा पडलो असलो, तर मागे हटणार नाही", असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT