OBC leader addressing media over claims related to the Manoj Jarange threat case. saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना धमकी देणारा त्यांच्याच जवळचा, ओबीसी नेत्याच्या दाव्याने खळबळ

OBC Leader Navnath Waghmare Serious Allegation : वाळू माफिया, मटका माफिया, दारू माफिया, जमीन माफिया यांच्या गराड्यात राहणाऱ्या जरांगे पाटील यांना कोण धमकी देईल? त्यांच्या जवळील व्यक्तीचं सीडीआर तपासले पाहिजेत, असं विधान ओबीसी नेत्यानं केलंय.

Bharat Jadhav

  • डॉनला कोणी धमकी देऊ शकता का?

  • माफियांच्या गराड्यात असणाऱ्याला कोण धमकी देईल?

  • झुंडशाही महाराष्ट्रात जरांगेमुळे झाली आणि ती आता पलटणार आहे.

अक्षय शिंदे पाटील, साम प्रतिनिधी

मनोज जरांगे महाराष्ट्राचे डॉन आहेत. डॉनला कोणी धमकी देऊ शकतो का? हे काही तरी वेगळेच प्रकरण आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेच्या अवती-भोवतीच्या लोकांचे सीडीआर तपासाले पाहिजेत, असे विधान ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलाय. वाघमारे यांच्या विधानानं राज्यभरात खळबळ माजलीय. मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या जिवाला धोका आहे. त्यांच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आलीय, अशी बाब उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

याप्रकणी पोलिसांनी दोनजणांना ताब्यात घेतलंय. त्यांची चौकशी करण्यात येत असून यातील एकजण हा मनोज जरांगे पाटील यांचाच जुना सहकारी असल्याचं सांगितलं जात आहे, तर सुपारी देणारा व्यक्ती बीडमधील मोठा नेता असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचदरम्यान ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी एक धक्कादायक विधान केलंय.

मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वेगळाच संशय व्यक्त केलाय. मनोज जरांगे महाराष्ट्राचे डॉन आहेत. डॉनला कोणी धमकी देऊ शकतो का? मला वेगळेच प्रकरण वाटत आहे. वाळू माफिया, मटका माफिया, दारू माफिया, जमीन माफिया यांच्या गराड्यात असणाऱ्याला कोण धमकी देईल? त्यांच्यातीलच कोणीतरी असू शकतो.

त्यांचे व्यवहारातील काही बिनसले असेल, त्यामुळे जरांगेचा आणि त्यांचा व्यवहार बिनसला असेल म्हणून त्यांच्याच लोकांनी धमकी दिली असेल, असा संशय नवनाथ वाघमारे यांनी व्यक्त केलाय. माध्यामांशी बोलताना वाघमारे यांनी जरांगेवरही टीका केली आहे. जरांगे ने पेरलं ते उगवणार आहे. जरांगे यांनीच आती केलं, त्याची माती व्हायला सुरुवात होईल.

झुंडशाही महाराष्ट्रात जरांगेमुळे झाली आणि ती आता पलटणार आहे. त्यामुळे जरांगेकडून त्यांचे स्वप्न पूर्ण झाली नाहीत की ते जरांगेंना ब्लॅकमेल करणार. जरांगेंना धमक्या देणारे काही काळानंतर त्यांचेच लोक आहेत. मनोज जरांगेंच्या अवतीभोवतीच्या लोकांचे सीडीआर तपासले पाहिजे. पोलीस प्रशासनाने जरांगेंच्या भोवती असलेल्या पाच-पन्नास लोकांचा गराडा आहे, त्या लोकांचेच मोबाईल सीडीआर तपासणी केली पाहिजे , असं वाघमारे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : नंदुरबारमध्ये आयशर टेम्पो आणि ट्रकची भीषण धडक, रक्ताच्या थारोळ्यात पडललेल्या जखमींना देवदूतचा हात

Gold Rate Today: सोनं झालं स्वस्त! १० तोळ्यामागे २७०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update: परभणीतील भाजपच्या 6 बंडखोर पदाधिकाऱ्यांची भाजपमधून हकालपट्टी

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांती स्पेशल तीळ बाजरीची भाकरी बनवा, वाचा सोपी पद्धत

Early Morning Stroke Symptoms: सकाळी उठल्यावर ही लक्षणे दिसल्यास असू शकतो ब्रेन स्ट्रोकचा धोका; वेळीच घ्या काळजी

SCROLL FOR NEXT