Manoj Jarange Patil  Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Video: सरकारनं फसवलं तर पुन्हा मुंबईत जाणार, मनोज जरांगे यांचा इशारा

Manoj Jarange Patil Warns Goverment: सरकारनं फसवलं तर दुसरी चक्कर मुंबईत आहेच, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सरकारनं फसवलं तर दुसरी चक्कर मुंबईत आहेच, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे सरकारनं मराठा आरक्षणासाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी अपेक्षा जरांगेंनी व्यक्त केलीय. तर दुसरीकडे 288 जागा लढायच्या की पाडायच्या हे 13 तारखेच्या बैठकीत ठरवणार असल्याचं जरांगे म्हणाले.

आज मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. यानंतर ते अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. यावेळी जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत जंगी स्वागत करण्यात आलं आहे. यानंतर उपस्थित लोकांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी सरकारला मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतर यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली ''सामाजिक सलोखा फक्त जरांगे बिघडवत आहेत. दुसरा कोणी बिघडवत नाही'', असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

इंव्हॉल्युवेशन ऑफ कास्ट काय आहे? हे जरांगे यांना माहीत नाही. आम्ही संविधानाच्या भाषेत लढाई करतो आणि तुम्ही अत्याचाराची ताकत वापरून बोलत आहात. त्यामुळे या राज्यत संविधान संमत नसेल तर आरक्षणाच गलिच्छ राजकारण करू दिल जाणार नाही. पवार आणि उद्धव ठाकरे यांनी वेगळं राजकारण करावं. संविधानाच राजकारण करू दिलं जाणार नाही, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Benefits: केळी खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? जाणून घ्या

Ritu Tawade : मुंबईच्या महापौर रितू तावडेंना दणका, सत्र न्यायालयाने ठोठवला दंड

Maharashtra News Live Update: पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 15,200 रुपयांची स्वस्त; 18K- 22K आणि 24K चे दर किती?

Healthy weight loss: जीम, डाएट करूनही वजन कमी होत नाहीये? आजपासूनच रात्रीच्या जेवणानंतर करा 5 गोष्टी

SCROLL FOR NEXT